जनता दल
भारतातील एक राजकीय पक्ष | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले |
| ||
| |||
जनता दल हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.
इतिहास
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. (बाकीचे पक्ष - काँग्रेस, हिंदुमहासभा, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग.) पुढे या पक्षाचे अनेक तुकडे झाले. जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला.
स्थापना
११ ऑक्टोबर १९८८ रोजी जनता पार्टी, जनमोर्चा आणि लोकदल हे पक्ष एकत्र करून विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जनता दलाची स्थापना केली. या पक्षात उत्तर प्रदेशचे चंद्रशेखर, हरियाणाचे देवीलाल आदी तत्कालीन बडे नेतेही सामील झाले. सन १९८९ च्या निवडणुकांत या पक्षाला लोकसभेत १४२ जागा मिळाल्या, आणि त्यांच्या पक्षाचे सरकार बनले, पण ११ महिन्यांत संपुष्टात आले. पुढे पंतप्रधान कोण होणार या मुद्द्यावर हा पक्ष फुटला.
पक्षाची फाटाफूटी
सन १९९० : चंद्रशेखर, देवीलाल आणि मुलायम सिंह यादव जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी 'समाजवादी पक्ष' नावाचा एक वेगळाच राजकीय पक्ष काढला.
सन १९९२ : समाजवादी पक्षातून मुलायम सिंह बाहेर पडले आणि त्यांनी एकट्याच्या जिवावर 'समाजवादी जनता पक्ष' नावाची पार्टी काढली.
सन १९९२ : (मुख्य) जनता दलातून अजित सिंह बाहेर पडले आणि त्यांनी लोकदल पक्षाची स्थापना केली.
सन १९९४ : नीतीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी मिळून 'राष्ट्रीय लोकदला'ची स्थापना केली. या राजकीय पक्षाचे नाव पुढे बदलले आणि 'समता पार्टी' झाले.
सन १९९६ : चंद्रशेखरांच्या 'समाजवादी पक्षा'तून देवीलाल बाहेर पडले आणि त्यांनी 'हरियाणा लोकदल (राष्ट्रीय)' नावाचा पक्ष स्थापन केला.
सन १९९७ : चारा घोटाळ्यानंतर लालूप्रसाद यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरले आणि त्यांनी रातोरात 'राष्ट्रीय जनता दल' नावाचा नवा राजकीय पक्ष काढून, आपली पत्नी राबडीदेवी हिला बिहारचे मुख्यमंत्री केले.
सन १९९७ : ओरिसाच्या नवीन पटनाईक यांनी जनता पक्षातून फारकत घेतली आणि 'बिजू जनता दल' नावाचा पक्ष स्थापन केला, आणि ओरिसात सत्ता काबीज केली.
सन १९९९ : शरद यादव यांनी जनता दलाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी 'जनता दल (संयुक्त)' नावाचा राजकीय पक्ष स्थापला. नीतीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस त्यांना मिळाले
सन १९९९ : कर्नाटकातले प्रभावशाली नेता रामकृष्ण हेगडे यांनी 'लोकशक्ति पार्टी' बनवली. पुढे हा पक्ष 'जनता दल युनायटेड'मध्ये समाविष्ट झाला.
सन १९९९ : एकेकाळी पंतप्रधान असलेले एचडी देवेगौडा यांनी जनता पक्षातून बाहेर पडून 'जनता दल (सेक्युलर)' नावाचा पक्ष बनवला आणि सत्ता मिळवली.
सन २००० : 'जनता दल युनायटेड'मधून वेगळे झालेले रामविलास पासवान यांनी 'लोक जनशक्ति पार्टी'ची स्थापना केली.
सन २०१७ : नीतीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी सख्य केल्यानंतर शरद यादव आणि ते त्यांचा जनता दल (युनायटेड) फुटण्याच्या मार्गावर आहे. शरद यादवांना खासदार पदावरून उपराष्ट्रपति यांनी अपात्र केले. सन २०२१ : रामविलास पासवान यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पक्षामध्ये मुलगा व भाऊ यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत पक्षाची दोन शकले पडली व अधिकृत चिन्ह गोठविलेल्या गेले.