Jump to content

जनगांव (तेलंगणा)

  ?जनगांव
तेलुगू : జనగామ
तेलंगणा • भारत
—  शहर  —
जनगांव रेल्वे स्थानक
जनगांव रेल्वे स्थानक
जनगांव रेल्वे स्थानक
Map

१७° ४३′ १२″ N, ७९° १०′ ४८″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१७.४९ चौ. किमी
• ३८२ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
समशीतोष्ण (Köppen)
• ७९० मिमी (३१ इंच)
२६.० °C (७९ °F)
• २१.६ °C (७१ °F)
• ३३ °C (९१ °F)
प्रांततेलंगणा
जिल्हाजनगांव
लोकसंख्या
घनता
५२,३९४
• २,९९६/किमी
भाषातेलुगू
संसदीय मतदारसंघभोंगीर (भुवनगिरी)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• UN/LOCODE
• आरटीओ कोड

• ५०६१६७
• +८७१६
• IN-ZN
• TS-27
संकेतस्थळ: जनगांव नगरपालिकेचे संकेतस्थळ

जनगांव (इंग्रजी :Jangaon)हे भारताच्या तेलंगणा राज्यातील जनगांव जिल्ह्याचतील शहर आणि जनगांव जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे जनगाव मंडळ आणि जनगाव महसूल विभागाचे मुख्यालय देखील आहे. हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे ८५ किलोमीटर (५३ मैल) अंतरावर आहे. हे राष्ट्रीय महामार्ग १६३ वर आहे. जनगाव हे नाव “जैनगाव” यावरून विकसित झाले, ज्याचा अर्थ “जैनांचे गाव”.[]

इतिहास

शहरात जैन लोकांचे अस्तित्व हे फार काळापासूनचे दिसते, त्यामुळेच जनगाव हे नाव “जैनगाव” यावरून विकसित झाले, ज्याचा अर्थ “जैनांचे गाव”. १९४८ पूर्वी हा भाग हैदराबाद संस्थानामध्ये होता त्यानंतर हे भारतामध्ये सामील झाले. आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेपासून ते २०१४ पर्यंत म्हणजेच तेलंगणा राज्याच्या निर्मिती पर्यंत हे शहर आंध्र प्रदेश राज्यामध्ये होते.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १२,२७६ कुटुंबांसह ५२,३९४ होती. एकूण लोकसंख्येमध्ये २६,७६४ पुरुष आणि २५,६३० स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९५८ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ५,१२३ मुले आहेत, त्यापैकी ७,३४७ मुले आणि ६,९९३ मुली आहेत—हे प्रमाण १,००० प्रति ९५२ आहे. ३८,९४८ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८२.३९% होता.[]

८६.०८% लोक हिंदू आणि (११.५५%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.८३%), शीख (०.२३%), बौद्ध (०.०२%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.२७%) यांचा समावेश होतो.[]

जनगाव शहरातील लोक ८६% तेलगू, ११.५ उर्दू, ०.३ मराठी, ०.२ पंजाबी, ०.४ इतर भाषिक आहेत.

भुगोल

जनगाव हे पूर्वेकडील दख्खनच्या पठारावर स्थित आहे आणि त्याची सरासरी उंची ३८२ मीटर (१,२५३ फूट) आहे.[]

जनगाव येथे उष्णकटिबंधीय हवामान आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, हा भाग अवर्षणप्रवण आहे आणि खूप उष्ण उन्हाळा, मध्यम हिवाळा आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो.[] जानगावमधील हवामानाला स्थानिक गवताळ हवामान म्हणून संबोधले जाते. वार्षिक पाऊस कमी आहे; येथील हवामान कोपेन-गीजर प्रणालीनुसार BSh म्हणून वर्गीकृत केले आहे. सरासरी वार्षिक तापमान २७.३ °C (८१.१ °F) आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७८८ मिलिमीटर (३१.० इंच) आहे.

पर्यटन

संस्कृती

कोलानुपाका मंदिर, जैनांसाठी एक धार्मिक स्थळ.

प्रशासन

जनगाव नगरपालिका ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. तिसऱ्या दर्जाची नगरपालिका म्हणून १९५३ मध्ये त्याची स्थापना झाली. २०१० मध्ये २८ नगरपालिका प्रभागांसह द्वितीय श्रेणीत श्रेणीसुधारित करण्यात आले. नागरी संस्थेचे कार्यक्षेत्र १७.४९ किमी (६.७५ चौरस मैल) मध्ये पसरलेले आहे.[]

वाहतूक

TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चा शहरात बस डेपो आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.

जनगाव रेल्वे स्थानक शहराला रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करते आणि दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहे.[]

शिक्षण

हे देखाल पहा

संदर्भ

  1. ^ "JANGAON DISTRICT | Welcome To Jangaon District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी पाहिले.
  2. ^ "भारताची जनगणना 2011 आंध्र प्रदेश" (PDF). line feed character in |title= at position 20 (सहाय्य)
  3. ^ "Jangaon Municipality City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Elevation of Jangaon,India Elevation Map, Topography, Contour". www.floodmap.net. 2022-02-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Jangaon climate: Average Temperature, weather by month, Jangaon weather averages - Climate-Data.org". en.climate-data.org. 2022-02-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Basic Information of Municipality | Jangaon Municipality". web.archive.org. 2017-04-06. 2017-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-04 रोजी पाहिले.
  7. ^ "South Central Railway". scr.indianrailways.gov.in. 2022-02-04 रोजी पाहिले.