जत संस्थान
जत संस्थान | ||||
| ||||
| ||||
राजधानी | जत | |||
सर्वात मोठे शहर | जत | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: सटवाजी राव डफळे (इ.स.१६८६-१७०६) अंतिम राजा: विजयसिंह राव डफळे (इ.स. १९२८-१९४८) | |||
अधिकृत भाषा | मराठी | |||
राष्ट्रीय चलन | रुपये | |||
लोकसंख्या | 91,202 | |||
–घनता | 35.9 प्रती चौरस किमी |
जत संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.
स्थापना
या संस्थानाची स्थापना १६८८ या वर्षी झाली.
राजधानी
या संस्थानाची राजधानी जत नगरात होते.
क्षेत्रफळ
या संस्थानाचे क्षेत्रफळ २,५३८ चौरस किमी इतके आहे. या संस्थानात सुमारे ११९ गावे होती.
संस्थानिक
या संस्थानाचे संस्थानिक डफळे घराणे आहे. यांचे मूळ आडनाव चव्हाण होते. ते ९६ कुळी मराठे आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळ
८ मार्च १९४८ या दिवशी जतचे महाराजा विजयसिंह राव यांनी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.