जगबुडी नदी
जगबुडी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | रत्नागिरी, महाराष्ट्र |
उपनद्या | chorad |
धरणे | natunagar dam |
जगबुडी नदी ही महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. जगबुडी नदी मोजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येऊन मिळते. नदीची लांबी ४५ किमी रुंदी असून संगमाजवळ १६५ चौ. कि. मी. इतकी आहे. ही नदी वशिष्ठी नदीची उपनदी असून ही उत्तर दक्षिण या दिशेने वाहते. जगबुडी नदी ही कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांमध्ये आहे. जगबुडी नदी जवळच कोकण मधील खेड रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे त्या नदीचे दर्शन घ्यायला सुकर होते. या नदीच्या पुलावर वरून मुंबई गोवा हायवे क्रमांक 66 हा जातो. त्यामुळे रस्तामार्गे सुद्धा या नदी जवळ पोहोचता येते. जगबुडी नदीजवळ भरणे नाका हे ठिकाण जवळ आहे. भरणे नाका येथून एक रस्ता खेड-दापोली कडे जातो. व दुसरा रस्ता जगबुडी नदी पुलावरून रत्नागिरी व गोव्याकडे जातो.