Jump to content

जगदाळे

घराणे- जगदाळे

जात- ९६ कुळी हिंदू-मराठा

वंश- चंद्र वंश

गोत्र - कपिल

देवक- धारेची तलवार, पंचपल्लव

कुलदैवत- जोतिबा / नृसिंह

कुलदेवता- पिंगळजाई(पिंगळी बुद्रुक) / तुळजाभवानी(तुळजापूर)/ खंडोबा, (जेजुरी)

गावे-

ता. पुरंदर:- गराडे,

ता. कराड:- मसूर,

ता.कोरेगाव:- कुमठे, कवडेवाडी.

ता.माण:- पिंगळी बुद्रुक, बोथे, शिरवली, बिदाल, पाचवड, मोगराळे,डंगीरवाडी

ता.खटाव:- बुध,पेडगाव,अंभेरी

ता.जि. सातारा:- नांदगाव

ता.बारामती:- शिरवली, मूर्ती

ता. फलटण:- साखरवाडी

ता.बार्शी:- बार्शी, चारे, घरी, पुरी


ता. दौंड:- दौंड, लिंगाळी


ता. शिरूर:- कर्डे, शिरूर

पदव्या- पाटील, देशमुख, सर-पाटील, सरदेशमुख, सरदार, सेनापती.


"जगदाळे घराणे" हे मुळचे धार(माळवा) येथील सम्राट परमार/पवांर/पवार यांच्या घराण्याची शाखा होय.पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि दळवी ही घराणी निर्माण झाली. श्रीमंत जगदाळे , पोकळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.पानिपतच्या युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे.

श्रीमंत सरदार जगदेवराव जगदाळे हे मसूर या शाखेचे मूळ पुरुष आहेत. जगदेवराव जगदाळे यांना चार पुत्र होते पैकी महादजी नाईक जगदाळे-देशमुख हे मसूर परगणा,आणि औन्ध परगणाची देशमुखी आणि पाटीलकी पाहत होते. विठोजी नाईक जगदाळे (मोकसदार) हे पेडगाव. तर कुमाजीराव जगदाळे देशमुख हे कराडची देशमुखीआणि आंबकची पाटीलकी पाहत होते. तर त्यांचे एक बंधू रामराव(रामराउ) जगदाळे देशमुख हे शिरवडेचे पाटीलकी करीत होते.

पैकी आंबक शाखेतील जगदाळे देशमुख यांचा वाडा सध्या पिंगळी बुद्रुक या ठिकाणी पिंगळजाई(तुळजाभवानी) रक्षणार्थ व इनाम गावी स्थित आहे.

या बाबतची दंतकथा अशी की, जगदाळे हे जगदंबेचे म्हणजेच देवी तुळजाभवानीचे रक्षक किंवा उपासक आहेत. यांपैकीच एक भक्त तुळजापूरला देवीच्या दर्शनाला गेले असता देवी तुळजाभवानी प्रकट झाली व त्याच्या डोक्यावर टोपली ठेवत म्हणाली "मी या टोपलीत बसत आहे तू मला घेऊन कोकणात चल. आणि जाताना कोठेही थांबू नकोस आणि मागे वळून पाहू नकोस. जर मला कोकणात पोचवलेस तर राजा होशील आणि थांबलास तर पाटील होशील." देवीच्या आज्ञेप्रमाणे भक्त देवीला घेऊन निघाला. परंतु पिंगळी बुद्रुक गावापाशी आल्यावर त्याला राहवेना. म्हणून तो मागे वळला, तत्क्षणी देवी टोपलीतून उतरली आणि मूर्तीरूपात पिंगळी गावात स्थानापन्न झाली. पिंगळी गावावरून देवीचे नाव पिंगळजाई झाले. तेव्हापासून जगदाळे सर्वत्र पाटील झाले आणि पिंगळजाई जगदाळ्यांची कूलदेवी झाली.

जगदाळे, पोकळे, पवार, दळवी आणि नाईक निंबाळकर हे एकाच वंशातील आहेत.

घराण्याचा विस्तार

बहामनी काळापासून या घराण्याला सुमारे १६८ गावाची मसूर परगणा येथील देशमुखी होती.नंतर शिवशाही आल्यामुळे वतनदारी पद्धत बंद झाली आणि देशमुखीच्या ऐवजी जगदाळे घराण्याने सर-पाटीलकी स्वीकारली.मसूर परगण्यातीलच काही गावाची पिढीजात सर-पाटीलकी शिवाजी महाराजांकडे सुद्धा होती.त्यावेळी या घराण्याला मसूर,गराडे व दौंड-लिंगाळी येथील दीडशे गावांची सर-पाटीलकी मिळाली[].जगदेवराव जगदाळे हे या घराण्याचे मूळ पुरुष समजले जातात.

इतिहास

सरदार जगदेवराव जगदाळे, सरदार महादजी जगदाळे, सरदार मल्हारराव जगदाळे, सेनापती आबाजीराव जगदाळे, सरदार यशवंतराव जगदाळे, सरदार पिराजीराव जगदाळे असे अनेक पराक्रमी मराठा योद्धे या घराण्यात होऊन गेले.

सरदार यशवंतराव जगदाळे व सरदार पिराजीराव जगदाळे यांनी पानिपतच्या लढाईत भीम-पराक्रम गाजवला दत्ताजीराव शिंदे यांच्यासमवेत ते नजीबखान याच्या विरुद्ध बुराडीघाटच्या लढाईत लढले. शिंदे यांच्या बरोबरच या दोन सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती या संग्रामात दिली[].

श्रीमंत छत्रपती शाहू (थोरले) महाराजांच्या आदेशावरून सरदार आबाजीराव जगदाळे (वय ७३) यांनी निजामाविरुद्ध १७४२ साली बेलूर मोहीम काढली, त्यावेळी त्यांनी महादजी शिंदे (वय ११) यांना मांडीवर बसवून मोहिमेस नेले. ....(संदर्भ- शिंदे दफ्तर)

गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा

या संदर्भातच १७३२ मधील नोंद उपलब्ध असून, गराडे या सासवडजवळील गावाची सर-पाटीलकी जगदाळे यांची होती.तर पोट-पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. ती नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे.गराडेसारख्या गावातदेखील गणेश-गौरीची प्रथा पूर्वापार चालत होती आणि तेथेसुद्धा मिरवणुकीने मानाच्या क्रमांकासह प्रतिष्ठापना होत होती.वंश परंपरेनुसार पहिला मान जगदाळे यांना होता []


संदर्भ

  1. ^ जगदाळे कैफियत- मराठा इतिहासाची साधने
  2. ^ पानिपत- विश्वास पाटील आणि पेशवा दफ्तर
  3. ^ भारत इतिहास संशोधक मंडळ