Jump to content

छोटी लालसरी

छोटी लालसरी किंवा चिमण शेन्द्र्या या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये comman pochard असे म्हणतात .तर मराठी मध्ये चिमण शेन्द्र्या आणि हिंदी मध्ये बुडार ,बुडार नर ,लाल सिर असे म्हणतात .

चिमण शेन्द्र्या हा पक्षी आकाराने बदकापेक्षा लहान पक्षी आहे .यामध्ये नर-मादी दिसायला वेगळे -वेगळे असतात .

Aythya ferina Sandwell 2

नराचे डोके आणि मान तांबड्या असते .व छाती आणि पाठीवरचा भाग काळा असतो .राहिलेला करड्या भागावर बारीक काड्या असतात .शेपटीचा खालचा आणि वरचा भाग काळ्या रंगाचा असतो .

मादीचे डोके, मान ,पाठीवरचा भाग ,छाती आणि शेपूट गडद तपकिरी रंगाचा असतो .कंठ ,चोचीजवळचा तोंडाचा भाग ,डोळ्यांभोवतीचे कडे बदिमी रंगाचे असतात .राहिलेला वरचा भाग राखिडी रंगाचा असतो .व खालील भाग पिवळट करडा असतो .

Common pochard (Aythya ferina)

हा पक्षी पाकिस्तान ,भारतचा वायव्य भाग, बांगला देश ,आसाम आणि सभोवतालचे प्रांत व दक्षिणेकडे कर्नाटकपर्यंत आढळते .हा पक्षी हिवाळ्यात आढळतात त्यामुळे यांना हिवाळी पक्षी असे म्हणतात .हा पक्षी पॅलिआर्क्टिक या प्रदेशात आढळतो हा पक्षीझिलानी आणिसरोवरे या ठिकाणी आढळतो .

2011.06.20 pochard, St. James Park, London, UK 013c
Aythya ferina

संदर्भ

पुस्तकाचे नाव:पक्षिकोश

लेखकाचे नाव:मारुती चितमपल्ली