Jump to content

छोटा बहिरी ससाणा

हेसुद्धा पाहा: बहिरी ससाणा आणि ससाणा


छोटा बहिरी ससाणा


छोटा बहिरी ससाणा किंवा बेसरा चिमणमार ससाणा याला इंग्रजी मध्ये southern besra sparrow hawk असे म्हणतात. हा ससाणा जातीतील एक शिकारी पक्षी आहे.

ओळख

छोटा बहिरी ससाण्याचा आकार कावळ्यापेक्षा लहान असतो. नराचा वरील भाग काळसर फिकट ते गडद राखाडी असतो. डोके काळसर व पोटाचा रंग तांबूस राखाडी ते लालसर काळा असतो. छातीवर पांढरे, काळसर पट्टे आणि शेपटीखालचा भाग पांढरा असतो. मादीच्या छातीवर व पोटावर तांबूस-पिंगट रेषा असतात .

आढळ

छोटा बहिरी ससाणा हा निलगिरी, पलनी केरळ, मुंबई ही पश्चिम घाटाची पट्टी, अशा भागात दिसतो. श्रीलंकेमध्ये मार्च ते मे मध्ये हा पक्षी स्थायिक असतो.

निवासस्थाने

छोटे बहिरी ससाणे हे चीरपल्लवी व पानगळीची दमट जंगले अशा ठिकाणी राहतात .

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली