छायाचित्रण
प्रकाश-संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सार यांची नोंद करून टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला छायाचित्रण असे म्हणतात. छायाचित्रण ही एक कला आणि शास्त्र आहे.
छायाचित्रण ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबून असते.
छायाचित्रण ही एक कला वस्तू , तिला पाहाण्याचा द्रुश्तिकोन व वेळ त्याच्या विविध अंगाण या वर अवलंबून असते.
कॅमेरा हे काही वषा॔पूवी॔ भौतिक पण आता एक इलेक्टोनिक वस्तू आहे.
पूर्वी यासाठी फिल्म कॅमेऱ्याचा वापर होत असे पण आजकाल डि़जिटल कॅमेरे आणि मोबाईल कॅमेरे जास्त लोकप्रिय आहेत.
उद्योग, व्यवसाय, जाहिराती, उत्पादन, कला, मनोरंजन, बहुसंवाद (mass communication) यांत छायाचित्रणाचा वापर होतो.
छायाचित्रण कला
छायाचित्रण ही आपला इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला आहे.
सध्याच्या काळात फोटोग्राफी हा एक आवडीचा विषय बनलेला आहे. प्रत्येकाला वाटत कि आपला फोटो हा छान यावा त्यामुळेच आजकालच्या डिजीटल मोबाईल मध्ये कॅमेरा हा पर्याय आहे. तरी आपण फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्याची योग्य निवड कशी करावी. आणि फोटोग्राफीसाठी प्रामुख्याने लाइट ही खूप महत्त्वाची असते. आपल्याला जर आपली प्रतिमा छान यावी वाटत असेल तर सूर्यकिरण येतात त्याच्या विरुद्ध दिशेला उभे राहून फोटो काढावेत. जर आपल्याला आपले फोटो छान यावा वाटत असेल तर सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फोटो काढावेत कारण सूर्यकिरणांचा मारा जास्त प्रमाणात नसतो. व फोटो जर दुपारी काढायचे असतील तर आपल्या पूर्ण शरीरावर सावली असावी कारण त्यामुळे आपल्या शरीरावर shade पडणार नाही.
फोटोग्राफी ही अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते. कोणत्याही गोष्टीचा फोटो काढत असताना आपण त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो जो आपल्याला त्या गोष्टीच्या जवळ नेतो. फोटो आणि हास्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवादव्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र आख्खा संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो.छायाचित्रण करत असताना त्या तून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे.
[भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील छायाचित्र विषयक तरतुदी]]
बाह्य दुवे
http://www.floridamemory.com/photographiccollection/photo_exhibits/photographic-processes/