Jump to content

चौसोपी वाडा

वास्तू प्रकार

चौसोपी वाडा हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील एक वास्तू प्रकार आहे. पूर्वीच्या काळात गावातील किंवा शहरातील जमीनदार, जहागीरदार, वतनदार, खोत इत्यादींचे चौसोपी वाडे असत. कोकणात व पुणे, कोल्हापूर, इत्यादी शहरांत हे चौसोपी वाडे आजही पाहायला मिळतात.

वास्तुस्वरूप

वाड्याच्या चार दिशांना लांबच्या लांब चार सोपे (ओवऱ्या), मध्ये खोल्या, नंतर पडव्या आणि शेवटी मधोमध प्रशस्त अंगण असे. यामुळे या वास्तुरचनेला चौसोपी (चार सोपे असलेले) असे म्हणतात. ह्या वाड्यात देवघर, स्वयंपाकघर, माजघर, सोपे(ओट्या), प्रशस्त खोल्या, पडव्या इत्यादीं गोष्टी असत.

हेही पाहा