चौरी चौरा
चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर शहराजवळचे गाव आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असहकार-आंदोलनादरम्यान इ. स. १९२२मध्ये ह्या गावात आंदोलकांनी पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीत २२ पोलीस भस्मसात झाले. ह्या घटनेमुळे आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागल्याने महात्मा गांधींनी आपले असहकार-आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.