चोलुतेका प्रांत
हा लेख होन्डुरासचा प्रांत चोलुतेका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चोलुतेका (निःसंदिग्धीकरण).
चोलुतेका प्रांत होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या या प्रांताच्या पश्चिमेस फोन्सेकाचा आखात हा प्रशांत महासागराचा भाग तर पूर्व आणि दक्षिणेस निकाराग्वा देश आहे. या प्रांताची राजधानी चोलुतेका नावाच्याच शहरात आहे.