Jump to content

चोर गणपती, सांगली

चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या इकोफ्रेन्डली ‘चोर गणपती’चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हणले जाते.[ संदर्भ हवा ]

या चोर गणपतीविषयी सांगलीकरांनाही उत्सुकता असते. चोर गणपती गुपचूपपणे जसा येतो तसाच तो विसर्जन न करताच पुन्हा होता त्या ठिकाणीच परत ठेवला जातो.

हे सुद्धा पहा

सार्वजनिक गणेशोत्सव

प्रसिद्ध गणपती मंदिरे

संदर्भ