Jump to content

चोपडा तालुका

  ?चोपडा

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

२१° १५′ ००″ N, ७५° १८′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हाजळगाव

चोपडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे केळीउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चोपडा शहर अंकलेश्वर - बुरहानपूर राष्ट्रीय महामार्गा वर वसलेले आहे. चोपडा तालुक्यात अडावद हे प्रमुख गाव आहे. चोपडा तालुक्यात खरद, नारोद, अंबाडे, वडगाव बु., पंचक, वर्डी, मंगरुळ, वडगाव सिम, धुपे, चहार्डि, वटार, सुटकार, चांदसणी-कमळगाव, गोरगावले, धानोरा वैगेरे गावे आहेत. तसेच अडावद जवळ तीर्थक्षेत्र उनपदेव देखील आहे. उनपदेव हे सातपुडा पर्वता जवळ असुन येथे गरम पाण्याचा झरा आहे.

चतुःसीमा

चोपडा हा सातपुड्याच्या पायथ्याशी आणि रत्नावती नदीच्या काठावर वसलेला तालुका आहे. मुंबईपासून साधारण ४०० कि.मी. उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, दक्षिणेला अमळनेर तालुका, पूर्वेला यावल आणि पश्चिमेला शिरपूर तालुका आहे.

जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव तालुका | भडगाव तालुका | पाचोरा तालुका | जामनेर तालुका | पारोळा तालुका | एरंडोल तालुका | धरणगाव तालुका | जळगाव तालुका | भुसावळ तालुका | मुक्ताईनगर तालुका | अमळनेर तालुका | चोपडा तालुका | यावल तालुका | रावेर तालुका | बोदवड तालुका