चॉकलेट चहा
चॉकलेट चहा हा चहा उटी मध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे.पश्चिम घाटातील निलगिरीच्या उंच पर्वतरांगांमध्ये होणारा हा चहा गडद आणि अत्यंत सुवासिक असतो.ह्या चहात कोका पावडर टाकून योग्य मिश्रण केल्यावर एक आगळी चव असलेला चहा बनतो.कोइंबतूर मधील चहा दुकानदार निर्मलराज म्हणतात कोइंबतूर आणि उटी मधील लहान मुलांचा पहिला चहा हा चॉकलेट चहा असतो.चॉकलेट चहाची चव जिभेवर रुळली की ते नेहमीच्या चहाकडे वळतात.मंद सुगंध हा हवाहवासा वाटणारा चॉकलेट चहाचा गुण आहे.
वैशिष्ट्य
ज्या लोकांना चहा आणि चॉकलेट आवडतात त्यांना हा चहा आणि नैसर्गिक कोको ह्यांच्या अचूक प्रमाणात मिश्रण केलेला हा चॉकलेट चहा एक वेगळाच अनुभव देतो.बहुतांश चॉकलेट चहा भाजलेल्या आणि निवडलेल्या कोको आणि काळा चहा ह्यांच्या योग्य मिश्रणातून बनवितात. नेहमीच्या कोकोच्या उर्जेशिवाय चहाला चॉकलेटी चव येते.थोड्याश्या दुधाने चहाला मंद मधुर गोडसर चव प्राप्त होते.चहाप्रेमींना चॉकलेटच्या चवीपेक्षा त्याचा सुंदर सुगंध आवडतो. उटी मधले चहा कंपनीचे महाव्यवस्थापक एल. वरदराजन म्हणतात की हा चहा दोन दशकांपासून प्रसिद्ध झाला आहे आणि त्यांनीच तो उटीमध्ये प्रथम आणला.ते मिश्रणासाठी मशीनचा वापर करतात. हे चहा मिश्रण नऊ महिने राहू शकते. परंतु हे मिश्रण तुम्ही तयार करून ठेवू शकता किंवा चहा बनवितात तेव्हा सुद्धा लगेच करू शकता.
साहित्य
१ चमचा काळी चहापावडर. १५० मिली. पाणी. कोको पावडर चवीनुसार. १/२कप दूध. २ चमचे साखर. चॉकलेट चुरा वैकल्पिक.
कृती
१.निलगिरी चहा पावडर घेतात आणि त्यामध्ये कोको पावडर मिसळवतात.नेमका किती चहा आणि किती कोको पावडर मिसळून घेतात ते गुपित असते. २.हे मिश्रण ८-१० दिवस ठेवतात. ३.पाणी गरम करतात. ४.पाण्यात चहा कोको पावडर मिश्रण टाकतात. ५.पुन्हा चहाला उकळी आणतात. ६.दूध आणि साखर टाकून चहा प्यायला देतात.
संदर्भ
मुंबई टाईम्स ०५/१०/२०१९.