चेसक्यूब
चेसक्यूब.कॉम (इंग्लिश: chesscube.com) जगभरातील लोकांना ऑनलाईन बुद्धिबळ हा खेळ उपलब्ध करून देणारे आंतरजालावरील एक संकेतस्थळ आहे. याची सुरुवात मार्क लेविट्ट याने २००७ साली केली. मार्च २०११ पर्यंत या संकेतस्थळावरील नोंदणीकृत सदस्यांची संख्या १४,००,००० होती.[१]
खेळाबरोबरच हे संकेतस्थळ सदस्यांना ऑनलाईन संवाद आणि चलचित्र सेवाही पुरविते.
चेसक्यूबची थेट बुद्धिबळ विकास प्रणाली ॲडॉब फ्लेक्स तंत्रज्ञानावर आधारीत आहे. चेसक्यूबचे वापरकर्ते जगभरातल्या जवळपास २०० देशातून आहेत.
इतर
जुलै, २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे वॅनबर्ग बॉईज हायस्कूलमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ महासंघ मानांकित एस अे ओपन स्पर्धेत सर्वप्रथम चेसक्यूबद्वारा ऑनलाईन सामने खेळवले गेले.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "चेसक्यूब संकेतस्थळाचा ब्लॉग" (इंग्लिश भाषेत). 2011-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "एस अे चेस ओपन इन्क्ल्यूड्स इंटरनेट प्ले" (इंग्रजी भाषेत). १ जून, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)