चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक
चेन्नई सेंट्रल भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | चेन्नई, तमिळनाडू |
गुणक | 13°4′56″N 80°16′31″E / 13.08222°N 80.27528°E |
मार्ग | दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग मुंबई−चेन्नई रेल्वेमार्ग चेन्नई−बंगळूर रेल्वेमार्ग |
फलाट | १५ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८७३ |
विद्युतीकरण | इ.स. १९३१ |
संकेत | MAS |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण रेल्वे |
स्थान | |
चेन्नई सेंट्रल (तामिळ: சென்னை சென்ட்ரல்; जुने नाव: मद्रास सेंट्रल) हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रल हे दक्षिण भारतातील सर्वात वर्दळीचे स्थानक असून येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. येथून भारतातील सर्व मोठ्या शहरांकडे प्रवासी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई सेंट्रल हे सर्वात मोठे केंद्र आहे.
चेन्नई सेंट्रलची इमारत १८७३ साली ब्रिटिशांनी बांधली. सध्या १५ प्लॅटफॉर्म असलेले चेन्नई सेंट्रल येथील आधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.
थाळा धोनीचे नाव स्थानकाला द्यावे अशी मागणी काही लोकानी केली आहे.
प्रमुख रेल्वेगाड्या
- चेन्नई-हजरत निजामुद्दीन - राजधानी एक्सप्रेस
- चेन्नई-नवी दिल्ली - ग्रॅंड ट्रंक एक्सप्रेस
- चेन्नई-नवी दिल्ली - तमिळनाडू एक्सप्रेस
- चेन्नई-हावडा - कोरोमंडल एक्सप्रेस
- चेन्नई-अहमदाबाद - नवजीवन एक्सप्रेस
- चेन्नई-हैदराबाद - चारमिनार एक्सप्रेस
- चेन्नई-जमू तावी - अंदमान एक्सप्रेस
- चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस
हे सुद्धा पहा
गॅलरी
- स्टेशनच्या आत
- बाजूने घेतलेले चित्र
- विस्तृत चित्र
- मुख्य प्रवेशद्वार
गुणक: 13°04′56″N 80°16′31″E / 13.08222°N 80.27528°E
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत