चेन्नई इग्मोर रेल्वे स्थानक
चेन्नई इग्मोर சென்னை எழும்பூர் (अक्षरॉंतरण: चेन्नै एळुम्बूर) भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | चेन्नई, तमिळनाडू |
गुणक | 13°4′41″N 80°15′39″E / 13.07806°N 80.26083°E |
मार्ग | चेन्नई इग्मोर-विजयवाडा मार्ग चेन्नई इग्मोर-कन्याकुमारी मार्ग चेन्नई इग्मोर-मुंबई मार्ग |
फलाट | १० |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९०८ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | MS |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण रेल्वे |
स्थान | |
चेन्नई इग्मोर (तामिळ: சென்னை எழும்பூர் தொடருந்து நிலையம், चेन्नै एळुम्बूर; जुने नाव: मद्रास इग्मोर) हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रलखालोखाल चेन्नई शहरामधील हे दुसरे प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून प्रामुख्याने तमिळनाडूच्या दक्षिणेकडील इतर शहरांसाठी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई इग्मोर हे एक स्थानक आहे.
चेन्नई सेंट्रलची इमारत १९०६ साली ब्रिटिशांनी बांधली जी सध्या चेन्नई शहरामधील सर्वात प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे.
प्रमुख रेल्वेगाड्या
- चेन्नई इग्मोर-दादर एक्सप्रेस
- चेन्नई इग्मोर-तिरुचिरापल्ली - रॉकफोर्ट एक्सप्रेस
- चेन्नई इग्मोर-तूतुकुडी एक्सप्रेस
- चेन्नई इग्मोर-रामेश्वरम बोटमेल एक्सप्रेस
- चेन्नई इग्मोर-मदुराई एक्सप्रेस
- मदुराई-हजरत निजामुद्दीन - तमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस
गॅलरी
- स्टेशनच्या आत
- बाजूने घेतलेले चित्र
- विस्तृत चित्र
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत