चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம் | |||
---|---|---|---|
आहसंवि: MAA – आप्रविको: VOMM MAA MAA | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | पब्लिक | ||
मालक | भारत सरकार | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | चेन्नई महानगर | ||
स्थळ | तिरुसुलम, तमिळनाडू, भारत | ||
हब | |||
समुद्रसपाटीपासून उंची | 52 फू / 16 मी | ||
गुणक (भौगोलिक) | 12°58′56″N 80°9′49″E / 12.98222°N 80.16361°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
07/25 | 12,001 | 3,658 | डांबरी |
12/30 | 6,708 | 2,045 | डांबरी-कॉंक्रीट |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | १,३८,११,१९१ | ||
सामान वाह्तुक टनामध्ये | ३,००,४९७ | ||
विमान | १,२४,७१२ | ||
स्रोत: भाविप्रा,[१][२] |
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MAA, आप्रविको: VOMM) (तमिळ: சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या चेन्नई शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेन्नई विमानतळ चेन्नई महानगराच्या दक्षिण भागात तिरुसुलम, मीनांबक्कम व पल्लावरम ह्या तीन उपनगरांमध्ये स्थित आहे. २०१४ साली १.३८ प्रवाशांची वाहतूक करणारा चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. ह्या विमानतळाच्या देशांतर्गत सेवेसाठी वापरात असलेल्या टर्मिनलला के. कामराज ह्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्याचे तर आंतरराष्ट्रीय टर्मिनलला सी.एन. अण्णादुराईचे नाव देण्यात आले आहे. भारतामधील अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपनींचे प्रमुख वाहतूकतळ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दक्षिण क्षेत्राचे मुख्यालय देखील येथेच स्थित आहे.
इतिहास
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाहुन १९५४ मध्ये एर इंडियाचे पहिले उड़्डाण मुंबई करिता बेळगाव मार्गे झाले होते. पहिला विमान टर्मिनल हवाई पट्टीच्या ईशान्य बाजूस बांधण्यात आले होते, की जे मीनांबक्कम उपनगराच्या बाजूने होते, त्यामूळे ह्या विमानतळाचे नाव मीनांबक्कम विमानतळ असे पडले. कालांतराने तिरूसुलम मध्ये नवीन टर्मिनल बांधण्यात आले व येथून नवीन प्रवासी सुविधा सुरू करण्यात आल्या. जुन्या मीनांबक्कम टर्मिनल इमारतीचा वापर सध्या मालवाहतूकीसाठी करण्यात येतो.
स्थापत्यप्रकार
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तीन टर्मिनल आहेत. मीनांबक्कम येथील जुने टर्मिनल आता मालसामानासाठी वापरले जाते तर तिरुसुलम येथील अंदर्देशीय व आंतरराष्ट्रीय अशी दोन नवीन टर्मिनल प्रवासी वापरता. यांना कामराज टर्मिनल आणि अण्णा टर्मिनल अशी नावे आहेत. ही दोन प्रवासी टर्मिनल जोडलेली आहेत.
परिवहन दुवे
चेन्नई विमानतळ राष्ट्रीय महामार्ग ४५ ह्या महामार्गावर स्थित आहे ह्यामुळे रस्त्याद्वारे ह्या विमानतळावर पोचणे सुलभ होते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे तिरुसुलम हे स्थानक देखील येथून जवळच स्थित आहे. बांधकाम चालू असलेल्या चेन्नई मेट्रोचा मार्ग १ चे दक्षिणेकडील टोक येथेच आहे. मेट्रोद्वारे हा विमानतळ चेन्नईमधील बहुतेक सर्व महत्त्वाच्या स्थळांसोबत जोडला जाईल.
विमानकंपन्या व गंतव्यस्थाने
प्रवासी सेवा
अपघात व दुर्घटना
ऑगस्ट १९८४मध्ये विमानतळापासून १.२ किमी अंतरावर झालेल्या बॉम्बस्फोटात ३३ व्यक्ति ठार तर २७ जखमी झाले होते.[३]
संदर्भदुवे
- ^ "TRAFFIC STATISTICS - DOMESTIC & INTERNATIONAL PASSENGERS" (jsp). Aai.aero. 31 December 2014 रोजी पाहिले.
- ^ "TRAFFIC STATISTICS - DOMESTIC & INTERNATIONAL PASSENGERS" (html). Aai.aero. 31 December 2014 रोजी पाहिले.
- ^ चेन्नई बॉम्बस्फोटाबद्दल ईलम सेनेच्या सेनापतीला अटक Archived 2009-10-07 at the Wayback Machine., द इंडियन एक्सप्रेस न्यूझ सर्व्हिस, फेब्रुवारी ८, इ.स. १९९८
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2006-07-12 at the Wayback Machine.
- विमानतळ माहिती