Jump to content

चेतन भगत

चेतन भगत

चेतन भगत (जन्म : २२ एप्रिल १९७४) हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आहेत. नवकल्पना लेखक आणि यशस्वी कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

पार्श्वभूमी

चेतन भगत यांचा जन्म दिल्लीत एक पंजाबी परिवारात झाला. त्यांचे वडील एक अधिकारी आहेत आणि त्यांची आई कृषी विभागात एक सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सुमारे एक दशकभर चेतन भगत हे हॉंगकॉंग गोल्डमन सत्यसेवेच्या इन्व्हेस्टमेंट बँकर पदावर काम करत होते. तेथे राहूनही त्यानी लेखन केले आहे. १९९८ मध्ये ते आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण पूर्ण केलेल्या तमिळनाडूच्या अनुषा सूर्यनारायण यांच्याशी विवाहबद्ध झाले.

शिक्षण

त्यांचे प्रारंभिक शिक्षण धौलाकुआं (Dhuala Kaun)), नवी दिल्लीचे सैन्यातील सार्वजनिक शाळेत (द आर्मी पब्लिक स्कूल येथे) झाले. (१९७८-१९९१) या साली शिक्षण घेतले.. नंतर अभियांत्रिकी पदवी आयआयटी, नवी दिल्ली येथून घेतली.(१९९१-१९९५) नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[] भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद ने त्यांना सर्वोत्कृष्ट नवोदित विद्यार्थी पुरस्कारांचे पदक प्रदान केले. चेतन भगत यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोल्डमन साच इन्व्हेस्टमेंट बँकिक कंपनी मध्ये २७ अंतर्गत मुलाखती दिल्यानंतर निवड झाली.

प्रसिद्ध प्रकाशित कादंबरी

त्यांची पहिली कादंबरी' फाईव्ह पॉईंट समवन' ही आहे. त्यांची 'वन नाईट ॲट कॉल सेंटर' ही कादंबरी गुडगांव येथील एका 'कॉल-सेंटर'वर आधारित आहे. आजही अनेक पुस्तक विक्री दुकानांमध्ये त्यांच्या या दोनही कादंबऱ्या विक्रीचे उच्चांक मोडताना दिसतात. चेतन भगत यांनी गोल्डमन सच या हॉंगकॉंग येथील  इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी मध्ये जवळ जवळ दहा वर्षे काम केले ते करत असतानाच  त्यांनी फाईव्ह पॉईंट समवन ही कादंबरी लिहिली. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ लेखक होण्यासाठी मुंबई मध्ये वास्तव्य करण्याचे ठरवले

लेखन

  • द गर्ल इन रूम १०५ एक नप्रेमकथा (मराठी अनुवाद : सुवर्णा अभ्यंकर)
  • "फाईव्ह पॉईंट समवन" (कादंबरी, इ.स. २००४) - याच कादंबरीवर आधारित "थ्री इडियट्स" हा हिंदी भाषेतील चित्रपट बनला आहे.
  • "वन नाइट ॲट द कॉल सेंटर" (कादंबरी, इ.स. २००५)
  • "थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ" (कादंबरी, इ.स. २००८)
  • २ स्टेट्स (२००९)
  • रिव्हाॅल्युशन २०२०
  • "टू स्टेट्स" (कादंबरी, इ.स. २०१०)
  • "हाफ गर्लफ्रेन्ड"
  • व्हाॅट यंग इंडिया वाॅन्ट्स (२०१५)

पुरस्कार

  • सोसायटी ऑफ यंग अचिव्हर्स ॲवॉर्ड (इ.स. २००४)
  • पब्लिशर्स रेकग्‍निशन ॲवॉर्ड (इ.स. २००५)
  1. ^ News laundry."Interview with Chetan Bhagat 15 October 2016" Retrieved 11 November 2016 "Interview with Chetan Bhagat 15 October 2016"" Check |url= value (सहाय्य).