Jump to content

चेतन दातार

चेतन दातार ( - २ आॅगस्ट २००८) हे एक मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी होते.[] त्यांनी देवदासी प्रथा, समलैंगिकता यांसारख्या संवेदनशील विषयांवर नाटके लिहिली.[] त्यांनी लिहिलेल्या 'एक माधव बाग' मधल्या स्वगताचे वाचन मोना आंबेगावकर करतात. या वाचनाचे प्रयोग महाराष्ट्रातील समलिंगी समुदायासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांकडून[] व गटांद्वारे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी झाले आहेत.[][] एका समलिंगी तरुणाचे त्याच्या आईला पत्राद्वारे आपल्या लैंगिकतेबद्दल सांगणारे पत्र हा त्या नाटकाचा मुख्य विषय आहे.[][] चेतन दातार यांनी अनेक जर्मन-इंग्रजी नाटकांची मराठी भाषांतरे केली होती.[ संदर्भ हवा ] 'आविष्कार' नावाच्या नाट्यसंस्थेचे ते महत्त्वाचे आधारस्तंभ होते.[ संदर्भ हवा ]

चेतन दातार यांनी लिहिलेली नाटके

  • आरण्य किरणं (मूळ हिंदी लेखक -वसंत देव)
  • एक माधव बाग (मराठी-हिंदी)[]
  • काॅटन ५६ (मूळ इंग्रजी, लेखक - रामू रामनाथन
  • जंगल में मगल (Midsummer’s Night Dreamsवरचा राजकीय फार्स)
  • झुलवा
  • पाॅलिएस्टर ८४ (मूळ इंग्रजी, लेखक - रामू रामनाथन
  • मस्ताना रामपुरी ऊर्फ छप्पन छूरी (हिंदी, मूळ ब्रेख्तचे Three Penny Opera)
  • मागोवा (सहलेखक - राजीव नाईक)
  • मैं भी सुपरमॅन (मूळ जर्मन-इंग्रजी)
  • राधा वजा रानडे
  • सावल्या

नाट्यनिर्मिती

  • गिरिबाला (रवींद्रनाथ टागोरांचे याच नावाचे नृत्यनाट्य)
  • महेश एलकुंचवारांचे 'हरवले प्रतिबिंब'


संदर्भ व नोंदी

  1. ^ "Marathi playwright Chetan Datar dead - Times of India". The Times of India. 2018-11-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Marathi playwright Chetan Datar dead - Times of India". The Times of India. 2018-11-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Play Reading "EK MADHAV BAUG" - Gaysi". Gaysi (इंग्रजी भाषेत). 2011-09-12. 2017-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-11 रोजी पाहिले.
  4. ^ "Remembering Chetan Datar: Decade after his death, Ek Madhav Baug playwright remains a giant of Marathi theatre - Firstpost". www.firstpost.com. 2018-11-11 रोजी पाहिले.
  5. ^ "Ek Madhav Baug - Play (Hindi) | 100th Performance (Hindi)". LGBT Events India (इंग्रजी भाषेत). 2018-01-09. 2018-11-11 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "What’s Queer about It? - Indian Express". archive.indianexpress.com (इंग्रजी भाषेत). 2018-11-11 रोजी पाहिले. C1 control character in |title= at position 5 (सहाय्य)
  7. ^ Arwind, Deepika (2010-04-19). "Seeking answers". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2018-11-11 रोजी पाहिले.
  8. ^ "Ek Madhav Baug, an attempt to promote gender equality - Times of India". The Times of India. 2018-11-11 रोजी पाहिले.