Jump to content

चॅनल टनेल

चॅनल टनेलचे स्थान

चॅनल टनेल किंवा खाडीखालचा बोगदा (इंग्लिश: Channel Tunnel; फ्रेंच: Le tunnel sous la Manche) हे इंग्लंडच्या केंट काउंटीला फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशासोबत जोडणारे इंग्लिश खाडीच्या खाली बांधलेले ५०.५ किमी लांबीचे रेल्वे भुयार आहे. ह्या भुयाराच्या एकूण लांबीपैकी ३७.९ किमी अंतर पाण्याखाली आहे. १९९४ साली बांधून पूर्ण झालेल्या ह्या भुयारामुळे लंडनपॅरिस ही युरोपामधील दोन सर्वात मोठी शहरे द्रुतगती रेल्वेने जोडली गेली आहेत. युरोस्टार ही वाहतूक कंपनी लंडन ते पॅरिस व ब्रसेल्स दरम्यान जलद प्रवासी वाहतूक सेवा पुरवते.


बाह्य दुवे