चुरमुरा
चुरमुरे याच्याशी गल्लत करू नका.
चुरमुरा हे उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असणारे एक गाव आहे. येथे हत्तींवर उपचारासाठी एक आधुनिक सोयींनी सुसज्ज असे रुग्णालय स्थापण्यात आले आहे. हे रुग्णालय वाईल्ड लाईफ एसओएस या संस्थेद्वारे स्थापण्यात आले आहे.[१]
येथे हत्तींचे वजन करण्याच्या मशिनसह, लेझर मशिन आदि सोयी आहेत.तसेच एलिफंट केर सेंटरमध्ये हत्तींचा सांभाळ केला जातो व त्यांची देखभाल केली जाते.[२]
संदर्भ
- ^ "ELEPHANT CONSERVATION AND CARE CENTER". 2018-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "संस्थेचा इतिहास". २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.