चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका
[[चित्|thumb|ग्वादार बंदर ]]
चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका हा ४६ अब्ज डॉलर किमतीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एक संग्रह आहे. पाकिस्तानातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी (रस्ते, रेल्वे, ऊर्जा प्रकल्प) आणि पाकिस्तान बरोबर मैत्री दृढ करण्यासाठी चीनने त्यांच्या १३व्या पंचवार्षिक विकास योजनेअंतर्गत ही गुंतवणूक केली आहे.
यामुळे पाकिस्तानात ७ लाख पेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील आणि अर्थव्यवस्था दरसाल २ ते २.५ टक्क्याने वाढेल. ग्वादार बंदर विकसित करून ते चीनशी जोडले जाईल.