Jump to content

चिल्का सरोवर

चिल्का सरोवर हे भारताच्या पूर्व भागातील ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यांत पसरलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी व या सरोवरातील वनस्पती आणि जनावरांच्या अनेक प्रजातींसाठी हे ओळखले जाते.