चिपळूण विधानसभा मतदारसंघ
चिपळूण विधानसभा मतदारसंघ - २६५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिपळूण मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्याच्या १. चिपळूण तालुक्यातील कलकवणे, शिरगांव, सावर्डे, चिपळूण ही महसूल मंडळे आणि चिपळूण नगरपालिका क्षेत्र आणि २. संगमेश्वर तालुक्यातील माखजन, कडवाई, फणसवणे, वाशी तर्फ संगमेश्वर, देवरूख आणि आंगवली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. चिपळूण हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम हे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | शेखर गोविंदराव निकम | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | सदानंद नारायण चव्हाण | शिवसेना | |
२००९ | सदानंद नारायण चव्हाण | शिवसेना |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
चिपळूण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सदानंद नारायण चव्हाण | शिवसेना | ७६०१५ |
रमेशभाई रामचंद्र कदम | राष्ट्रवादी | ५७५३१ |
सूर्यकांत तुकाराम साळुंके | मनसे | १०६४२ |
निशिकांत नारायण भोजने | अपक्ष | ३१९५ |
समीर विश्राम मोहिते | बसपा | २३६८ |
सुरेश बाबू पड्याल | रासप | १८८५ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".