Jump to content

चिपको आंदोलन

Chipko (es); চিপকো আন্দোলন (bn); Mouvement Chipko (fr); ચીપકો આંદોલન (gu); चिपको आंदोलन (bho); چِپکو تحریک (pnb); Ĉipko (eo); Chipko movement (en); Чипко (ru); चिपको आंदोलन (mr); Chipko-Bewegung (de); Movimento Chipko (pt); チプコ運動 (ja); ಚಿಪ್ಕೊ ಚಳುವಳಿ (kn); 抱树运动 (zh); Čipko judėjimas (lt); Chipko hareketi (tr); چپکو تحریک (ur); Movimento Chipko (it); Chipko (ca); trädkramare (sv); Ruch Chipko (pl); ചിപ് കൊ പ്രസ്ഥാനം (ml); תנועת צ'יפוקו (he); Чіпко (uk); चिपको आन्दोलन (hi); Chipko movement (te); ਚਿਪਕੋ ਅੰਦੋਲਨ (pa); চিপকো আন্দোলন (as); حركة تشيبكو (ar); Chipko (br); சிப்கோ இயக்கம் (ta) movimiento ecológico (es); ഇന്ത്യയിലെ പരിസ്ഥിതിസരക്ഷണ സമരപ്രസ്ഥാനങ്ങളിൽ പ്രശസ്തമായ ഒന്ന് (ml); moviment ecologista de l'Índia (ca); प्रमुख भारतीय पर्यावरण आन्दोलन (1970) (hi); ಚಿಪ್ಕೊ ಚಳುವಳಿ ೧೯೭೦ರಲ್ಲಿ ನೆಡೆಯಿತು (kn); ਭਾਰਤੀ ਜੰਗਲਾਤ ਸੰਭਾਲ ਅੰਦੋਲਨ (pa); Indian forest conservation movement (en); indische Naturschutzbewegung (de); Chipko movement (te); झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन (mr) Chipko, ചിപ്കൊ (ml); Chipko Andolan (ca); चिपको आंदोलन (hi); Chipko Movement (de); Чіпко-Андолан, Рух Чіпко (uk); Chipko Andolan (en); Движение Чипко (ru); 契普克 (zh); Chipko Andolan (te)
चिपको आंदोलन 
झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारconservation movement
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

चिपको आंदोलन हे भारतातील एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळ आहे, ज्याचे उद्दिष्ट जंगलतोड थांबवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे होते. हे आंदोलन १९७० च्या दशकात उत्तराखंड (त्या वेळी उत्तर प्रदेश) राज्यातील हिमालयाच्या पर्वतरांगा परिसरात सुरू झाले.

चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली.[]

ठेकेदार झाडं कापायला असंख्य माणसं घेऊन आला की ‘त्या’ झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि ‘पेड कटने नही देंगे’च्या घोषणा द्यायच्या. एप्रिल १९७३ मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली. अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले. ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती, ती नाकारली गेली होती. त्यामुळे साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला लोकांनी विरोध केला. त्यातून ‘चिपको’ आंदोलन उभे राहिले. त्यात गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. गौरादेवीने गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले.

जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार होते तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली. ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण, एकीनीही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही. शेवटी मजूरांनी माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं. पुढे हे आंदोलन ‘चिपको’ आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दि.२१ मे २०२१ रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोना ने निधन झाले.

इतिहास

बिश्नोईंचे हत्याकांड

इ.स. १७३० मध्ये जोधपूरच्या महाराज अभयसिंह यांनी राजवाडा बांधायचा ठरवले. त्यासाठी चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे होते. ते शोधताना जोधपूरपासून सोळाच मैलांवर बिश्‍नोईंचे खेजडली गाव होते. गावाजवळ खेजडीची मुबलक झाडी होती, जवळच चुन्याच्या खाणीही होत्या. राजाचे कामगार कुऱ्हाडी घेऊन खेजडलीला पोचले. बिश्‍नोई लोकांनी विरोध केला. संतप्त दिवाणाने हुकूम केला, "चला, झाडे तोडा.' सारे गावकरी विनवण्या करू लागले, "आमचा धर्म तुडवू नका, ही वृक्षसंपदा नासू नका." वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. त्यात गावातली अमृतादेवी आघाडीवर होती. सैनिकांच्या तलवारीने अमृतादेवीबरोबर गावातले ३६३ गावकरी मारले गेले. आणि बिश्‍नोईंचे जीव गेल्यावर राजाची मग्रुरी उतरली. तो खेजडलीला पोचला, माफी मागितली. यापुढे बिश्‍नोईंच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही, अशी हमी दिली.

गढवालची गौरीदेवी

अमृतादेवीचा कित्ता गढवालच्या गौरीदेवीने गिरवला. गढवालमधील रेनी गावाजवळची झाडे तोडण्यासाठी ठेकेदारची माणसे आली, तेव्हा गावातल्या पुरुषांना नुकसानभरपाई देण्याच्या आमिषाने चमोलीला नेण्याताले होते. गावात फक्त स्त्रियाच होत्या. गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेली गौरीदेवी हिने गावतल्य बायकांना जमा केले आणि त्यांनी रात्रभर झाडांना चिपकून उभ्या राहिल्या हे ‘चिपको आंदोलन’ देशभर गाजले आणि गौरीदेवीमुळे समाजाला एक नवा आदर्श मिळाला.

प्रमुख नेते

  1. गौरा देवी: चिपको आंदोलनातील प्रमुख महिला नेत्यांपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह झाडांना मिठी मारून संरक्षण केले.
  2. सुंदरलाल बहुगुणा: त्यांनी चिपको आंदोलनाचे नेतृत्व केले आणि या चळवळीला व्यापक स्तरावर पोहचवले. त्यांचे नारा "Ecology is the permanent economy" प्रसिद्ध आहे.
  3. चंडी प्रसाद भट्ट: त्यांनी देखील या चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि स्थानिक समुदायांना एकत्र केले.

आंदोलनाच्या प्रमुख घटनाक्रम

  1. रैणी गावातील संघर्ष (१९७४): या गावातील महिलांनी वृक्षतोड करणाऱ्यांना विरोध करून झाडांना मिठी मारली आणि त्यांच्या कटिबद्धतेमुळे वृक्षतोड थांबवण्यात आली.
  2. १९८० ची राष्ट्रीय बंदी: चिपको आंदोलनामुळे १९८० मध्ये भारत सरकारने हिमालयातील जंगलतोडीवर १५ वर्षांसाठी बंदी घातली.
  3. स्थानिक पातळीवरील परिणाम: आंदोलनामुळे स्थानिक पातळीवरील निर्णयांमध्ये स्थानिक समुदायांच्या सहभागाची आवश्यकता मान्य झाली.

परिणाम आणि प्रभाव

  1. पर्यावरणीय संरक्षण- चिपको आंदोलनामुळे जंगलतोड थांबवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आणि पर्यावरणीय संरक्षणाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण झाली.
  2. महिला सक्षमीकरण- या आंदोलनाने महिलांच्या भूमिकेला महत्त्व दिले आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणा दिली.
  3. जागतिक प्रेरणा- चिपको आंदोलनाने जागतिक पातळीवर पर्यावरणीय चळवळींसाठी एक प्रेरणादायी उदाहरण दिले.

चिपको आंदोलनाने निसर्ग संरक्षणाच्या दृष्टीने एक नवा मापदंड स्थापित केला आणि पर्यावरणीय न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली. आजही हे आंदोलन पर्यावरणीय चळवळींचे एक प्रमुख उदाहरण म्हणून स्मरणात आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ David C. Pitt. Chipko Movement The Future of the Environment: The Social Dimensions of Conservation and Ecological Alternatives.

बाह्य दुवे

दै.सकाळमधील लेख Archived 2016-03-04 at the Wayback Machine.