Jump to content

चिनी-तिबेटी भाषासमूह

आशियाच्या नकाशावर चिनी-तिबेटी भाषा

चिनी-तिबेटी हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या भाषाकुळात दक्षिण, आग्नेयपूर्व आशियामधील ४०० भाषांचा समावेश होतो. इंडो-युरोपीय भाषाकुळाखालोखाल चिनी-तिबेटी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक भाषिक असणारा भाषासमूह आहे. चीन, तैवान, बर्मा तसेच ईशान्य भारतात ह्या भाषा वापरल्या जातात. चिनी-तिबेट समूहामधील बहुसंख्य भाषा हिमालयामधील अत्यंत दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लहान जमातींद्वारे वापरल्या जातात. अशा अनेक भाषांचे वर्गीकरण सुस्पष्टपणे होऊ शकलेले नाही व अनेक तज्ञांमध्ये ह्यावरून वाद चालू आहेत.

चिनी-तिबेटी कुळाचे ढोबळ रित्या खालील वर्गीकरण होते.

मणिपुरी, बोडो, मिझो इत्यादी अनेक भाषांच्या वर्गीकरणावर एकमत नसल्यामुळे त्यांना विविध भाषातज्ञांनी वेगवेगळ्या गटांमध्ये घातले आहे.