Jump to content

चित्रा रामकृृष्ण

चित्रा रामकृृष्णनॅशनल स्टाॅक एक्स्चेंजशी संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्या वित्तीय सेवांशी संबंधित व्यवसायात काम करतात.

शिक्षण

वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी सीएची पदवी प्राप्त केली.

कारकीर्द

आयडीबीआय मध्ये नोकरी करताना त्यांनी राष्ट्रीय व्याप्तीचे प्रकल्प केले. १९८८ ते १९९० च्या काळात सेबीच्या निर्मितीसाठी तयार केलेल्या छोट्या गटात त्यांचा समावेश होता. यात त्यांनी सेबीची कायदेशीर चौकट तयार करण्यास मदत केली. सेबी कायदा १९९१-९२ मध्ये प्रत्यक्षात आला.[]

विशेष योगदान

नॅशनल स्टाॅक एक्सचेंजची संकल्पना आणि निर्मिती करण्याच्या महत्त्वाच्या कामासाठी चित्रा यांचा सहभाग आहे. अर्थतज्ञ एस.एस. नाडकर्णी यांनी या चित्रा यांच्यासह पाच व्यक्तींची निवड केली. नियामक स्वरूपाची कामे करीत असतानाच अत्त्युत्तम तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे स्थैर्य या संकल्पना हाताळणे हेही या गटाने केलेले काम होय.यामुळे नवीन उत्पादने आणि अधिक सक्षम बाजारपेठ अशी कार्यपद्धती विकसित होऊ शकली.[] जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजेस पैकी एकचा शिल्पकार असलेल्या चित्रा २०१३ मध्ये रवि नारायण् यन्च्या नन्तर् एन्. एस्. ई.च्या व्यवस्थापक आणि सी. इ. ओ. झाल्या. सन २०१४ मध्ये 'फोर्ब्ज् वीमेन ऑफ् द् ईअर्' हा सन्मान मिळाला होता. []

नॅॅशनल स्टाॅॅक एक्सचेंजचा पदभार

नॅशनल टाॅक एक्सचेंजची सीईओ म्हणून २०१२ साली चित्रा यांनी पदभार स्वीकारला.भारतीय जनतेच्या आर्थिक कल्याणाचे माध्यम अशी चित्रा यांची आपल्या कामाविषयी धारणा आहे. बाजारपेठेचा अभ्यास,अर्थ शिक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी शैक्षणिक आणि जागृती उपक्रम यावर चित्रा भर देतात.[]

विचार

आपल्या कामामध्ये द्रष्टेपणा,प्रामाणिकपणा,निष्ठा,चिकाटी आणि अभ्यासविषयाची आस्था हे गुण यशस्वी होण्यासाठी आवश्यक व पूरक ठरतात असे चित्रा रामकृृष्ण यांचे मत आहे.[]

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-08 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2018-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-08 रोजी पाहिले.
  3. ^ संपादक नैना लाल, किडवाई (२०१७). ३० सामर्थ्यशाली स्त्रिया. पुणे: सकाळ प्रकाशन. pp. पान क्रमांक ८९. ISBN ९७८-९३-८६२०४-०६-६ Check |isbn= value: invalid character (सहाय्य).
  4. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-08 रोजी पाहिले.
  5. ^ नैना लाल किडवाई,३०सामर्थ्यशाली स्रिया,अनु.गजेंद्रगडकर वर्षा,२०१६, पृृष्ठ ९० ते १००