Jump to content

चित्रा पालेकर

चित्रा पालेकर अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या आणि लेखिका आहेत. समलैंगिक व्यक्तींना समान हक्क मिळवून देण्याच्या चळवळीत त्यांचा सहभाग असतो. या अर्थशास्त्रात एमए आहेत.

पालेकर यांची कलेतली कारकीर्द १९६७ मध्ये, मुंबईतल्या प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झाली. त्यांनी ‘थिएटर युनिट’, ‘रंगायन’, ‘अनिकेत’ इत्यादी संस्थांच्या हिंदी-मराठी नाटकांत भूमिका करत राज्य-नाट्य स्पर्धेत बक्षिसे मिळवली.

१९८०मध्ये चित्रा पालेकर चित्रपट माध्यमाकडे वळल्या. त्यांची प्रथम निर्मिती व प्रमुख भूमिका असलेल्या आक्रीत या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. त्याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सहदिग्दर्शक आणि निर्मिती-संकल्पक या भूमिकाही पार पाडल्या.

चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका

  • आक्रीत (निर्मिती आणि प्रमुख भूमिका)
  • कच्ची धूप (हिंदी दूरचित्रवाणी मालिका; पटकथा-संवाद)
  • कल का आदमी (हिंदी चित्रपट; पटकथा-संवाद)
  • कैरी (हिंदी चित्रपट; पटकथा-संवाद)
  • थोडासा रुमानी हो जायें (हिंदी चित्रपट; पटकथा-संवाद)
  • दायरा (हिंदी चित्रपट; अतिरिक्त पटकथा-संवाद)
  • ध्यासपर्व (हिंदी चित्रपट; पटकथा-संवाद)
  • नकाब (हिंदी दूरचित्रवाणी मालिका; पटकथा-संवाद)
  • पाऊलखुणा (मराठी दूरचित्रवाणी मालिका; पटकथा-संवाद)
  • पोर्ट्रेट ऑफ अ व्हिजनरी (इंग्रजी माहितीपट - निर्मिती)
  • बनगरवाडी (चित्रपट; अतिरिक्त पटकथा-संवादलेखन)
  • माती माय (चित्रपट - दिग्दर्शन) : हा चित्रपट १४ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महोत्सवांतून दाखवला गेला व त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले.