Jump to content

चित्रलेखा पुरंदरे

प्रा .डॉ. चित्रलेखा पुरंदरे या एक मराठी लेखिका आहेत त्या बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या धाकट्या भावाच्या स्नुषा आहेत. पुण्यामधील नूतन मराठी विद्यालयातील चित्रकला विभागप्रमुख विश्‍वासराव रामचंद्र पुरंदरे उर्फ श्‍यामराव पुरंदरे (निधन मे २०१७) हे त्यांचे पती.

चित्रलेखा पुरंदरे यांनी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रबंध लिहून पी‍एच.डी. मिळवली आहे.

डॉ. चित्रलेखा पुरंदरे या २५हून अधिक वर्षं अध्यापन, लेखन व ग्रंथसंपादन करीत आहेत. विविध क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वांची त्यांनी लिहिलेली चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. अतिशय समृद्ध, प्रासादिक, प्रवाही आणि लालित्यपूर्ण भाषाशैलीसाठी त्या नावाजल्या गेल्या आहेत. त्यांना त्यांच्या लेखनाबद्दल काही पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

चित्रलेखा पुरंदरे या 'मी.... येसूवहिनी' या स्वरचित सांगीतिक कार्यक्रमाचे अभिवाचन करतात.

प्रसिद्ध पुस्तके

  • अबोल प्रवासी
  • आत्म्याचे नाव अविनाश
  • आनंदवनाचा विकास (डाॅ. विकास आमटे यांच्यावरील पुस्तक)
  • उद्यमशील समाजव्रती (शांतिलाल मुथ्था यांचे हे चरित्र)
  • काटेरी जीवन रुपेरी वाटा (डाॅ दामोदर बळीराम पतंगे यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन)
  • डॉ. किरण बेदी : मॅगसेसे हा प्रतिष्ठेचा शांतता पुरस्कार मिळविणारी जगातील पहिली पोलीस अधिकारी
  • केवड्याचं अत्तर (लघुकथासंग्रह)
  • खगोल अभ्यासक जयंत नारळीकर (चरित्र)
  • देव दानवां नरे निर्मिले (सहलेखक डॉ. अनिल गांधी)
  • मेजर ध्यानचंद : भारतीय हॉकीचे शिल्पकार (चरित्र)
  • नयनमनोहर : डाॅ मनोहर कृष्णाजी डोळे यांचे चरित्र
  • नीरेकाठाचे 'माणिक' (माणिकलाल रामचंद्र शहा यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन, सहसंपादक - शरद भोसले)
  • मना सर्जना (लेखक डॉ. अनिल गांधी, शब्दांकन चित्रलेखा पुरंदरे)
  • राजमान्य राजेश्री (बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र; लेखिकेच्या पी‍एच.डीच्या प्रबंधावर आधारित)
  • विकास आनंदवनाचा
  • Dr. Vikas Amte Anandwan's Journey From Pain To Paradise (इंग्रजी)
  • शिवशाहिरांचे वाङ्मयीन ऐश्वर्य (लेखिकेच्या पी‍एच.डीच्या प्रबंधावर आधारित)
  • सेंद्रिय शेतीची यशोगाथा : एका एकराची अभिनव 'ज्ञानेश्वरी'