चित्रफलक (तारकासमूह)
तारकासमूह | |
चित्रफलक मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Pic |
---|---|
प्रतीक | चित्र ठेवण्याची लाकडी चौकट |
विषुवांश | ४.५३ ता ~ ६.८५ |
क्रांती | −४३° ~ −६४ |
चतुर्थांश | एसक्यू१ |
क्षेत्रफळ | २४७ चौ. अंश. (५९वा) |
मुख्य तारे | ३ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | १५ |
ग्रह असणारे तारे | ६ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | नाही |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | १ |
सर्वात तेजस्वी तारा | α Pic (३.३m) |
सर्वात जवळील तारा | कॅप्टेनचा तारा (१२.७७ ly, ३.९२ pc) |
मेसिए वस्तू | नाही |
उल्का वर्षाव | नाही |
शेजारील तारकासमूह | सीलम नौकातल पारावत असिदंष्ट अरीत्र शफरी |
+२६° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो. जानेवारी महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
चित्रफलक हा दक्षिण खगोलार्धातील अगस्ती तारा आणि मोठा मॅजेलॅनिक मेघ यांच्यामधील तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव Pictor (पिक्टर) असून त्याचा लॅटिन भाषेतील अर्थ 'चित्रकार' आहे. चित्र ठेवण्याची लाकडी चौकट प्रतीक असणाऱ्या या तारकासमूहाला निकोला लुई दे लाकाय याने १८व्या शतकात नाव दिले होते.[a]
गुणधर्म
चित्रफलक एक लहान तारकासमूह असून त्याच्या उत्तरेला पारावत, पूर्वेला अरीत्र आणि नौकातल, वायव्येला सीलम, नैऋत्येला असिदंष्ट आणि दक्षिणेला शफरी तारकासमूह आहेत. चित्रफलक हा तारकासमूह १८ भुजांचा बहुभुज असून याच्या सीमा युजिन डेलपोर्टे यांनी १९३० मध्ये निश्चित केल्या. सीमा विषुवांश ०४ता ३२.५मि ते ०६ता ५२.०मि, आणि क्रांति −४२.७९° आणि −६४.१५° यामध्ये आहेत. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने या तारकासमूहासाठी १९२२ मध्ये "Pic" या तीन अक्षरी लघुरूपाचा अवलंब केला.[४] हा मुख्यत: दक्षिण गोलार्धामध्ये जानेवारी महिन्यात चांगला दिसतो आणि २६° उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील सर्व निरीक्षकांना वर्षातील काही दिवस पाहता येऊ शकतो.
वैशिष्ट्ये
तारे
चित्रफलक अंधूक तारकासमूह आहे. त्याचे तीनही तेजस्वी तारे प्रखर अश्या अगस्ती ताऱ्याशेजारी दिसतात.[५] चित्रफलकमद्ये ६.५ आभासी दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी ४९ तारे आहेत.[b][७] पृथ्वीपासून ९७ प्रकाश-वर्ष अंतरावरील अल्फा पिक्टोरिस हा पांढरा मुख्य अनुक्रम तारा चित्रफलकमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. त्याची आभासी दृश्यप्रत ३.३ आहे.[८] हा तारा स्वतःभोवती सुमारे २०६ किमी/से वेगाने फिरत आहे. बीटा पिक्टोरिस हा ३.८६ दृश्यप्रतीचा आणखी एक पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे. पृथ्वीपासून ६३.४ प्रकाश-वर्ष अंतरावरील या ताऱ्याभोवती १९८४ साली धुळ आढळली जी ताऱ्याभोवती चपट्या तबकडीच्या आकारामध्ये फिरत आहे.[९] तेव्हापासून या ताऱ्याभोवती गुरूच्या आठ पट वस्तूमानाच्या परग्रहाचा शोध लागला आहे. तो ग्रह ताऱ्याभोवती ८ खगोलीय एकक अंतरावरून परिभ्रमण करत आहे. हे अंतर आपल्या सूर्यापासून शनी ग्रहाएवढे आहे.[१०]
गॅमा पिक्टोरिस हा नारंगी राक्षसी तारा आहे ज्याचा व्यास तो तारा फुगल्यामुळे सूर्याच्या १.४ पट झाला आहे.[११] ४.५ दृश्यप्रतीचा हा तारा पृथ्वीपासून १७४ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.[१२] ईटा२ पिक्टोरिस जो एचआर १६४९ या नावानेदेखील ओळखला जातो, एक नारंगी राक्षसी तारा आहे, ज्याची दृश्यप्रत ५.०५ आहे. पृथ्वीपासून ४७४ प्रकाश-वर्ष अंतरावरील या ताऱ्याचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा ५.६ पट मोठा आहे.
बीटा शिवाय चित्रफलकमधील पाच इतर ताऱ्यांभोवती परग्रह आढळले आहेत. एचडी ४०३०७ हा नारंगी, ७.१७ दृश्यप्रतीचा मुख्य अनुक्रम तारा आहे. पृथ्वीपासून ४२ प्रकाश-वर्ष अंतरावरील ताऱ्याभोवती सहा ग्रह फिरत आहेत, ज्यापैकी एक त्या ताऱ्याच्या वास्तव्ययोग्य क्षेत्रामध्ये आहे. कॅप्टेनचा तारा हा १२.७८ प्रकाश-वर्ष अंतरावरील ८.८ दृश्यप्रतीचा लाल बटूतारा आहे. बर्नार्डच्या ताऱ्यानंतर याची योग्य गती सर्वात जास्त आहे.[१४] आकाशगंगेमध्ये इतर बऱ्याचश्या ताऱ्यांच्या तुलनेत विरुद्ध दिशेने फिरणारा हा तारा आकाशगंगेमध्ये विलीन झालेल्या बटू दीर्घिकेमधून आला असावा असा अंदाज वर्तवला जातो.[१५] २०१४ मध्ये या ताऱ्याभोवती कॅप्टेन-बी आणि कॅप्टेन-सी हे दोन परग्रह आढळले. कॅप्टेन-बी सर्वात जुना संभाव्य वास्तव्ययोग्य ग्रह आहे. सुमारे ११ अब्ज वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाली असा अंदाज वर्तवला जातो.[१६]
दूर अंतराळातील वस्तू
एनजीसी १७०५ ही १.७ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील आकारहीन बटू दीर्घिका आहे. ती आपल्या जवळच्या विश्वातील सर्वात सक्रीयपणे तारे निर्माण करणारी दीर्घिका आहे.[१७] पिक्टर ए ही ४८.५ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील दोन लोब असणारी रेडिओ दीर्घिका[१८] आणि दक्षिण खगोलार्धातील रेडिओ लहरींची सर्वात शक्तिशाली स्रोत आहे.[१९] एसपीटी-सीएल जे०५४६-५३४५ एक मोठा दीर्घिकांचा समूह आहे. ७ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावरील या समूहाचे वस्तुमान ८ लाख कोटी सूर्यांएवढे आहे.[२०]
जीआरबी ०६०७२९ हा २९ जुलै २००६ साली पहिल्यांदा निरीक्षण करण्यात आलेला एक गॅमा किरण स्फोट होता. तो शक्यतो १सी प्रकारच्या अतिनवताऱ्याचा सिग्नल होता.[२१][२१]
Notes
संदर्भ
- ^ Chesneau, O.; Dessart, L.; Mourard, D.; Bério, Ph.; Buil, Ch.; Bonneau, D.; Borges Fernandes, M.; Clausse, J. M.; Delaa, O.; Marcotto, A.; Meilland, A.; Millour, F.; Nardetto, N.; Perraut, K.; Roussel, A.; Spang, A.; Stee, P.; Tallon-Bosc, I.; McAlister, H.; Ten Brummelaar, T.; Sturmann, J.; Sturmann, L.; Turner, N.; Farrington, C.; Goldfinger, P. J. (2010). "Time, spatial, and spectral resolution of the Hα line-formation region of Deneb and Rigel with the VEGA/CHARA interferometer". Astronomy and Astrophysics. 521: A5. arXiv:1007.2095. Bibcode:2010A&A...521A...5C. doi:10.1051/0004-6361/201014509.
- ^ van de Kamp, P. (1953). "The Twenty Brightest Stars". Publications of the Astronomical Society of the Pacific. 65: 30. Bibcode:1953PASP...65...30V. doi:10.1086/126523.
- ^ Lamers, H. J. G. L. M.; Stalio, R.; Kondo, Y. (1978). "A study of mass loss from the mid-ultraviolet spectrum of α Cygni (A2 Ia), β Orionis (B8 Ia), and η Leonis (A0 Ib)". The Astrophysical Journal. 223: 207. Bibcode:1978ApJ...223..207L. doi:10.1086/156252.
- ^ IAU, The Constellations, Pictor.
- ^ Moore, Stargazing 2000, पान. 118.
- ^ The Bortle Dark-Sky Scale.
- ^ Ridpath, Constellations: Lacerta–Vulpecula.
- ^ SIMBAD Alpha Pictoris.
- ^ Smith & Terrile 1984.
- ^ Lagrange 2010; ESO 2010.
- ^ Pasinetti-Fracassini et al. 2001.
- ^ SIMBAD Gamma Pictoris.
- ^ "Beta Pictoris – Comparison". ESA/Hubble. 26 February 2015 रोजी पाहिले.
- ^ Motz & Nathanson 1988, पाने. 374–75.
- ^ Kotoneva et al. 2005.
- ^ Anglada-Escudé 2014.
- ^ Wilkins & Dunn 2006.
- ^ NED Pictor A.
- ^ Perley et al. 1997.
- ^ Ghosts of the Future.
- ^ a b Cano et al. 2011.
स्रोत
गुणकः ०५ता ००मि ००से, −५०° ००′ ००″
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.