Jump to content

चित्रपट गीते

हिंदी चित्रपटांतील गाण्यांचा ’हिंदी फिल्म गीत कोश’ कानपूरच्या हरमंदिरसिंह ’हमराज’ने केला आहे. त्या कोशाचे पाच खंड आहेत. प्रत्येक कोशात एका दशकातली गाणी आहेत. १९३१पासून सुरुवात करून हा कोश आता १९८०पर्यंत आला आहे. सहावा खंड १९१८१-८५साठी असेल, सातव्यात १९८६-९०मधली आणि आठव्या खंडात १९९१ ते १९९५ या काळातील गाणी असतील.

हरमिंदर सिंग ’हमराज’च्या या कोशात गीतकारासंबंधी अधिक माहिती मिळत नाही. ही अडचण आता थोड्या प्रमाणात का होईना, ’बखर गीतकारांची’ या ’मैत्रेय प्रकाशन’च्या पुस्तकाने दूर झाली आहे. हे पुस्तक विजय पाडळकर यांनी संपादित केले आहे. या ग्रंथात इ.स. १९४७ ते २००० या काळातील लता मंगेशकारांनी गायिलेली गीते ज्या गीतकारांची आहेत, अशा २२५ गीतकारांची फोटोसहित ओळख करून दिली आहे.

१९३१ ते २००५ या काळातील हिंदी चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शकांच्या माहितीसाठी ’धुनों की याद’ हे पंकज राग यांचे पुस्तक (प्रकाशनवर्ष इ.स. २०१०) आहे. पुस्तक जाडजूड असून त्याचे वजन सुमारे दीड किलो आहे.