चित्पावनी बोलीभाषा
चित्पावनी ही मराठी भाषेची एक बोलीभाषा आहे. ही भाषा महाराष्ट्रात दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली असली तरी अजूनही गोव्याच्या काही भागात आणि कर्नाटकातील काही भागात विशेषतः कारवार, उडुपी भागात ही भाषा अजूनही काही कुटुंबांत बोलली जाते. हिचा वापर मुख्यत्वे चित्पावन ब्राह्मण समाजात होत असे.[१]
चित्पावनी बोलीवर पहिले प्रबळ कार्य करणाऱ्या डॉ. सौ वसुधा भिडे ह्यांनी पुणे विद्यापीठ येथून वर्ष १९८३ मध्ये पी एच डी पदवी "चित्पावनी बोली" ह्या विषयावर अर्जित केली. [१][२]
कालान्वये अशोक नेने व श्रीधर बर्वे सारखे लेखक पुढे आले, आणि चित्पावनी भाषेत पुस्तके लिहून प्रकाशित केली.[३]
"साद चित्पावनीचो" हा पहिलाच चित्पावनी अंक फेब्रुवारी २०२४ मध्ये गणपुले फौंडेशन (ठाणे) ने प्रकाशित केला आहे.[४]
चित्पावनी बोलीतले काही शब्द
सलो - होतो
सस - आहेस
सां/से - आहे
आत्वार - स्वैपाकघर
आंबडणे - हाकलणे
आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इत्यादी
सत - आहेत
ओखद - औषध
कई =कधीतरी
कामेरी - कामकरी स्त्री
कार्रोय =कुठेही
कितां - काय?
कें - कोठे/कुठे?
केडला - कधी
केंथीन - कोठून?
खळां= अंगण
खायल्या =खालच्या
गोरवां ढोरवां - गुरे ढोरे
चिचाहारली - चिंचेकडली
जपाचां - जपायला
ठिकाण=कुळागर
ठेयलांसे - ठेवले आहे
तां - तें
तेला - त्याला, तसेच हेला - ह्याला. माला - मला
तोरेचां पाणी - गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळे वापरतात. त्यामुळे ती फळे वापरली की पाणी बाधते. तशा पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात.
नी, मां, मरे - ?
नेचे - नेते
पणस=फणस
पहू=पोहे
पेरां= पेरू
बेडे=सुपाऱ्या
बोड्यो - मुलगा
भाऊश - भाऊ
भिंडा - कोकम
भेणिश - बहीण
माटव=मांडव
माड्यो=माडीचे बहुवचन. माडी=पोफळीचे झाड
में - मी
म्हणीं - म्हणून
येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता
ऱ्हेव्वे =रहायला; त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला
रात्रीचां -रात्रीचे
वय - झाड्या/काट्याकुट्यांचे कुंपण
वर्खां=वर्षे
शकसां= शकेन
शिरश्याची=शिरशीची (शिरशी या गावची)
सत =आहेत
सनार=असणार
सयन - असेन
सलां = होतं
सांगेव्यो= सांगाव्यात
सांबारां - आमटी
सोपसत - संपतात
हाड - आण;
०हारी - ०कडे
चित्पावनी भाषेसंबंधी पुस्तके
- A Descriptive Study of Citpavni- A dialect of Marathi (Dr. Vasudha Bhide)[१]
- चित्पावन आणि चित्पावनी (डॉ. वसुधा भिडे)
- ओळख चित्पावनीची (डॉ. वसुधा भिडे)
- सुलभ चित्पावनी - लेखक श्री. श्रीधर बर्वे, अस्नोडा गोवा
- खडतर जिणा - लेखक. श्री.अशोक नेने (कडतरी, गोवा)
- काळजातले कुकारे - लेखक. श्री.अशोक नेने (कडतरी, गोवा)
- चित्पावनी भाषेतील पहिले नाटक - "ना घरना दार" लेखक. श्री. अशोक नेने
- चित्पावनी भाषेतील नाटक - निबरातील सावली लेखक. श्रीधर बर्वे (अस्नोडा, गोवा)
संदर्भ
- बालकांड (लेखक ह.मो. मराठे)
- माजे मामात्यांच्यो गजाली - लेखिका : सौ. स्मिता मोने अय्या
- ना घर ना दार
- Chitpavni- Amchi Bhas (www.thechitpavana.org)
- चित्पावनी बोलीचा प्रवास- श्री अशोक नेने (www.chitpavana.org)
- Dr. Vasudha Bhide
- ^ a b c "Chitpavni- Amchi Bhas". thechitpavana.org (इंग्रजी भाषेत). 2024-02-24. 2024-03-11 रोजी पाहिले.
- ^ "Dr. Vasudha Bhide". thechitpavana.org (इंग्रजी भाषेत). 2024-03-19. 2024-03-19 रोजी पाहिले.
- ^ "चित्पावनी बोलीचा प्रवास- श्री अशोक नेने (मराठी लेख)". thechitpavana.org (इंग्रजी भाषेत). 2024-02-25. 2024-03-11 रोजी पाहिले.
- ^ "Saad Chitpavnicho- Reviving Chitpavni with Ganpule Foundation". thechitpavana.org (इंग्रजी भाषेत). 2024-02-24. 2024-03-11 रोजी पाहिले.