चितळे डेअरी
चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था आहे. हिची स्थापना इ.स. १९३९मध्ये भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली.
चितळे यांची दुसरी पिढीतीले काकासाहेब व नानासाहेब चितळे यांनी ही कंपनी पुढे चालवली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया, दूध पाश्चरायजेशन, विविध दुग्ध उत्पादने तयार करणारी ही एक मोठी नावाजलेली कंपनी आहे.
प्रतिदिन २.४ लाख लिटर दुग्धोत्पादन क्षमतेची ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते.