चिखल्या खेकडा
चिखल्या खेकडा (इंग्लिश: Mud crab) ही खेकडयाची जात आहे. खाण्यासाठी लोकप्रिय असलेल्या या खेकड्याची व्यावसायिक तत्त्वावर जोपासना आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्ट्यांवर केली जाते.
प्रकार
स्काइला (Scylla) जातीचा हा खेकडा मुख्यतः किनारपट्टया, नद्यांची मुखे व पश्चजलात (बॅकवॉटर) सापडतो.
प्रजाती
मोठी प्रजाती
- मोठ्या प्रजातीला स्थानिक लोक ‘हिरवा चिखल्या खेकडा' म्हणतात.
- तो २२ सें.मी. रुंदीपर्यंत वाढतो.
- ह्या खेकड्याच्या पायांवर तसेच कवचावर बहुकोनीय नक्षी असल्याने तो सहज ओळखता येतो.
लहान प्रजाती
- लहान प्रजातीच्या खेकड्यांना ‘लालनांग्या' म्हणतात.
- तो १२.७ सें.मी. रुंदीपर्यंत वाढतो व त्याचे वजन १.२ किलो असते.
- ह्याच्या अंगावर बहुकोनीय नक्षी नसते व तो जमिनीतील बिळात राहतो.
- दोन्ही जातींच्या खेकड्यांना देशी-परदेशी मासळीबाजारांत मोठी मागणी असते.
कवच-जोपासना
काही आठवडे मऊ पाठीच्या खेकड्यांची जोपासना (फॅटनिंग) करण्यात येते, ज्यायोगे त्यांचे कवच (एक्झोस्केलेटन) टणक होते. मऊ खेकड्यांपेक्षा टणक खेकड्यांना तिप्पट वा चौपट देखील किंमत मिळू शकते.
तलावांतील कवच-जोपासना
- भरतीच्या पाण्याने भरणाऱ्या लहान तलावांतही कवच-जोपासना करता येते. ह्या ठिकाणी १ ते १.५ मीटर खोल पाणी ठेवतात. तलावाचा आकार ०.०२५ ते ०.२ हेक्टर असतो.
- ह्याआधी तलावातले पाणी काढून तळ उन्हात कोरडा केला जातो व योग्य प्रमाणात चुनखडी टाकली जाते.
- तलावाच्या भिंती व बंधारे व्यवस्थित आहेतना हे पहावे लागते. गटाराची (स्ल्यूस गेट) तोंडे नीट बंद करावी कारण हे खेकडे त्यांतून पळून जाण्यात पटाईत असतात. पाणी आत येण्याच्या जागेवर बांबूच्या चटया लावाव्या.
- ह्या तलावांना बांबू व जाळीचे कुंपण घालतात. ह्या कुंपणाची वरची बाजू तलावाकडे म्हणजे आत झुकलेली असल्याने खेकडे त्यावर चढून पळून जाऊ शकत नाहीत.
- स्थानिक कोळी व व्यापाऱ्यांकडून घेतलेले मऊ खेकडे शक्यतो सकाळच्या वेळी तलावात सोडले जातात. खेकड्यांच्या आकाराप्रमाणे त्यांची संख्या दर चौरस मीटरमध्ये ०.५ ते २ इतकी ठेवली जाते.
- ५५० ग्रॅम व त्यापेक्षा जास्त वजनाच्या खेकड्यांना बाजारात मोठी मागणी असते म्हणून शक्यतो असेच खेकडे बाळगावे. मात्र अशा प्रत्येक खेकड्याला १ चौरसमीटर जागा आवश्यक आहे.
- पाणखेकड्यांची उपलब्धता आणि तलावाच्या ठिकाणानुसार एका तलावात ६ ते ८ वेळा फॅटनिंगची क्रिया करता येते.
- तलाव मोठा असल्यास त्याचे योग्य आकाराचे छोटे भाग करून प्रत्येक भागात विशिष्ट आकाराचे खेकडे जोपासणे अधिक योग्य आहे. ह्याने त्यांचे संगोपन आणि काढणी सोपी होते.
- जोपासणीच्या दोन हंगामांत बराच कालावधी असल्यास एका आकाराचे खेकडे एका विभागात ठेवता येतील.
- नर खेकड्यांकडून होणारे हल्ले कमी करण्यासाठी ह्या विभागांमधून लिंगानुसार वर्गवारी करून खेकडे ठेवणेही फायदेशीर ठरते. तसेच त्यांच्या आपसातील मारामाऱ्या कमी होण्यासाठी फरशा, जुने टायर्स किंवा वेताच्या टोपल्या तलावात टाकून ठेवल्या तर त्यांमधून लहान खेकडे आसरा घेऊ शकतात.
खुराडी व पिंजऱ्यांमधून कवच-जोपासना
- उथळ नदीमुखे, कालवे व भरतीचे पाणी येण्याजाण्याची चांगली सोय असलेल्या श्रिंप तलावांत सोडलेली तरंगती खुराडी, जाळी व टोपल्यांतूनही फॅटनिंग करता येते.
- हाय डेन्सिटी पॉलियुरेथिन (एचडीपीई), नेटलॉन किंवा बांबूच्या कामट्यांची जाळी वापरता येतात.
- हा पिंजरा साधारण ३ मी x २ मी x १ मी आकाराचा असावा.
- अन्न देणे व देखभालीच्या सोयीसाठी हे पिंजरे एका ओळीत ठेवावे.
- पिंजऱ्यामध्ये दर चौरस मीटरमध्ये १० तर खुराड्यांमध्ये दर चौरस मीटरमध्ये ५ खेकडे ठेवा. पिंजऱ्यात खेकड्यांची संख्या जास्त असल्याने, त्यांची आपसांतील भांडणे कमी करण्यासाठी, त्यांच्या नांग्यांची टोके काढून टाका.
ह्या पद्धतींचा, तलावातील जोपासनेप्रमाणे, अजून व्यावसायिक पातळीवर वापर झालेला नाही.
ह्या दोन पद्धतींमधून फॅटनिंग जास्त फायदेशीर पडते कारण जोपासनेचा अवधि कमी आणि फायदेशीर असतो, जेव्हां स्टॉकिंग मटेरियल पुरेसे असल्याची खात्री असते. भारतामध्ये, ग्रो-आउट तितकेसे लोकप्रिय नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे त्यासाठी लागणारी खेकड्यांची वीण (क्रॅब-सीड) व व्यावसायिक अन्नपुरवठा उपलब्ध नाहीत.
अन्नपुरवठा
खेकड्यांना दररोज फेकून दिलेले मासे, खारे पाणशिंपले अथवा कुक्कुटपालनातला कचरा (उकळून) खायला दिला जातो. खेकड्याच्या वजनाच्या सुमारे ५ ते ८ टक्के वजनाचे अन्न त्याला पुरवतात. मात्र दिवसातून दोनदा खायला देत असल्यास अन्नाचा जास्त भाग संध्याकाळी द्या.