Jump to content

चिखलवाडी

  ?चिखलवाडी

भारत
Map

१६° ५६′ ४०.२″ N, ७४° ०८′ २१.१२″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
संकेतस्थळ: http://sangli.gov.in/
  ?चिखलवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

१६° ५६′ ४०.२″ N, ७४° ०८′ २१.१२″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरशिराळा
जिल्हासांगली जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

चिखलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

चिखलवाडी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोरणा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. गावाच्या उत्तरेला पवारवाडी हा चिखलवाडीचाच एक भाग आहे .

गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची शाळा आहे.

गावात भैरवनाथाचे देऊळ आहे. त्या मंदिराबाहेर जवळजवळ (केव्हा पासून?)200 वर्षांपूर्वीची गोरखचिंचेची व वडाची झाडे आहेत. गावाच्या प्रवेशालाच भैरवनाथाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. दरवर्षी अक्षय तृतीयेला गावात भैरवनाथाची यात्रा भरते. दसऱ्याला भैरवनाथाचा पालखी सोहळा असतो.

गावाच्या दुसऱ्या टोकाला आई निनाईचेच मंदिर आहे. हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले सधन गाव आहे. अंगाई हा मराठी सुपरहिट सिनेमाचे बरेच चित्रीकरण या गावात झाले आहे.

गावात कर्ले, पवार, सावंत, वाठारकर, देसाई, मोरे, शिंदे, खवरे, पायमल, मांडे या आडनावाचे लोक आहेत.

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate