चिखलगांव
village in Khed (Rajgurunagar) Taluka | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतातील गाव | ||
---|---|---|---|
स्थान | पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
| |||
चिखलगांव तालुका- खेड जिल्हा- पुणे.
खेड(राजगुरुनगर ) तालुक्यातील पश्चिम पट्टयातील मोठया लोखसंख्येचे गाव म्हणजे चिखलगांव होय.या गावाचा इतिहास पाहता पूर्वी हे गाव नदीच्या काठी वसलेले होते व सर्व लोक हे एकत्रित रित्या घरे बांधून राहत होते. परंतु १९७७ रोजी मंजूर झालेले चासकमान धरणामुळे आजूबाजूच्या २० ते २२ किलो मीटर पर्यंत वसलेली गावे ही भूसंपादना खाली आली त्यापैकी एक हे गाव होय. त्यामुळे नदीतीरावरिती वसलेले हे गाव उठले व जो तो आपआपल्या शेती व जमिनीनुसार राहावयास गेला. व अस्या पद्धतीने गावाचा विस्तार झालेला दिसतो. आणि यामुळे मूळ गाव हे पाण्याखाली गेले व गुरव वस्ती, मुकेवाडी, दरावस्ती , गावठाण , सावंतवाडी, बुधलघाट, डामसेवस्ती, वडवस्ती अशी वाड्या वस्त्यात रूपांतर झाले. २०११ च्या जणगणनेनुसार गावची लोकसंख्या १३६३ आहे. येथील लोक मुळात उद्योग व व्यवसाय वर अवलंबून आहेत. शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय आहे. त्याचबरोबर भात हे मूळ पीक असले तरी इतरही पिके घेतली जातात.
महत्त्वाची ठिकाणे :
१. ह. भ. प. गुरुवर्य मारुती बाबा गुरव पादुका मंदिर
२. हनुमान मंदिर
३. दत्त मंदिर
४. गणेश मंदिर
५. क्रिकेट मैदान
६. कळमोडी धरण
७. शासकीय आश्रम शाळा चिखलगाव
८. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा