चिक चाॅकलेट
चिक चाॅकलेट तथा ॲंटोनियो झेवियर वाझ (१९१६ - मे, १९६७) हे एक ट्रंपेट वादक होते. ते मूळ गोव्याचे राहणारे होते. मुंबईच्या ताजमहाल हाॅटेलात त्यांचा एक जाझ बॅंड होता. ते मुंबईतील सर्वोत्कृष्ट जाझ संगीतकारांपैकी एक समजले.
चिक चाॅकलेट यांनी काही हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजनही केले आहे. त्यांचे ट्रंपेट वादन अनेक ध्वनिमुद्रणांमध्ये ऐकू येते.
हिंदी चित्रपट 'नादान' (सन १९५१)चे ते संगीत दिग्दर्शक होते. 'नादान'मधील तलत महमूदचे 'आ तेरी तसवीर बना लूॅं' आणि लता मंगेशकरचे 'सारी दुनिया को पीछे छोडकर' ही दोन गाणी ऐकली तरी चिक चाॅकलेट यांचे संगीतकार म्हणून काॅशल्य नजरेत भरते.
चिक चाॅकलेट हे एन. दत्ता आणि सी. रामचंद्र यांचे चांगले मित्र होते. एन. दत्ता यांची कारकीर्द घडविण्यास चिक चाॅकलेट यांचा मोलाचा वाटा आहे.
चिक चाॅकलेट यांचे योगदान असलेले हिंदी चित्रपट
- कर भला (१९५६, संगीत दिग्दर्शन)
- नादान (१९५१, संगीत दिग्दर्शन)
- निराला (१९५०, साहाय्यक संगीत दिग्दर्शक)
- भाई भाई (१९५६ साहाय्यक संगीत दिग्दर्शक)
- रंगीली (१९५२, संगीत दिग्दर्शन)