Jump to content

चिंदोडी लीला रंगमंदिर

चिंदोडी लीला रंगमंदिर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरातले एक प्रसिद्ध नाट्यगृह होते. त्याची मालकी दावणगिरीच्या करी बसव राजेंद्र नाटक मंडळीच्या कन्नड संस्कृती कला केंद्राकडे होती. नाट्यगृहाची इमारत बेळगावमधील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवर कपिलेश्वर मंदिराशेजारी होती. येथे एक वातानुकूलित नसलेले ३०'x ७०’ मापाचे बंदिस्त सभागृह होते आणि त्यात २५’ x ३०’आकारमानाचा रंगमंच होता. रंगमंचासमोर मोठा दर्शनी पडदा होता. प्रेक्षागृहात प्रेक्षकांना बसण्यासाठी ६०० लोखंडी खुर्च्या होत्या.

नाट्यगृहाचे नाव प्रख्यात कानडी नाट्य आणि चित्र अभिनेत्री चिंदोडी लीला हिच्या वरून ठेवले गेले होते चिंदोडी लीलाच्या इ.स. २०१० मध्ये झालेल्या मृत्यूनंतर नाट्यगृहाची शान ओसरली. आणि, सप्टेंबर २०११मध्ये नाट्यगृह पाडायला सुरुवात झाली. त्या जागी आता गणपती विसर्जनासाठी एक मोठा हौद बांधण्यात येणार आहे. कपिलेश्वराच्या मंदिराजवळचा तलाव आता त्या कामासाठी अपुरा वाटू लागला आहे. .