चिंदविन नदी
चिंदविन नदी (बर्मी भाषा: ချင်းတွင်းမြစ်) म्यानमारमधील प्रमुख नदी आहे.
चिंदविन | |
---|---|
इतर नावे | निंग - थी |
उगम | कचिन राज्य, हुकोंग खोरे |
मुख | इरावती नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश | म्यानमार |
लांबी | १,२०७ किमी (७५० मैल) |
उगम स्थान उंची | १,१३४ मी (३,७२० फूट) |
ह्या नदीस मिळते | इरावती नदी |
उपनद्या | तनाई, ताब्ये, तवान आणि तारोन |
ही नदी इरावती नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे. मणिपुरी लोक या नदीला निंग-थी म्हणून ओळखतात. हीचा उगम म्यानमारच्या कचिन राज्यातील हुकॉंग खोऱ्यात आहे. तनाई, ताब्ये, तवान आणि तारोन नद्यांच्या संगमापासून चिंदविन नदी सुरू होते. मुखापासून होमालिन शहरापर्यंत यात मोठ्या नौका ये-जा करतात.[१],[२],[३]
संदर्भ यादी
- ^ Jajo, Ersilia; . Arunkumar, L; Moyon, Wanglar Alphonsa (2021-02-01). "ICHTHYOFAUNA OF MAKLANG RIVER, CHINDWIN RIVER BASIN OF MANIPUR". INDIAN JOURNAL OF APPLIED RESEARCH: 38–41. doi:10.36106/ijar/1817108. line feed character in
|title=
at position 55 (सहाय्य) - ^ editor., Hirsch, Philip,. Routledge Handbook of the Environment in Southeast Asia. ISBN 978-1-315-47489-2. OCLC 1019728381.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: extra text: authors list (link)
- ^ John., Kress, W. (2009). The weeping goldsmith : discoveries in the secret land of Myanmar. Abbeville Press. ISBN 978-0-7892-1032-6. OCLC 246892608.