Jump to content

चिंटू


चिंटू
जनकचारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर
सद्य स्थिती / वेळापत्रकचालू
माध्यमछापील
प्रकाशकसकाळ
शैलीविनोदी

चिंटू ही सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक नोव्हेंबर २१, इ.स. १९९१ रोजी सकाळ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला.[] तेव्हापासून आजवर चिंटू अनेक आबालवृद्धांचा लाडका बनला आहे. दोन वर्षे ही चित्रकथा लोकसत्ता वृत्तपत्रातून प्रकाशित होत होती.

या चित्रकथेतील पात्रांवर आधारित असलेला एक मराठी चित्रपट चिंटू याच नावाने २०१२ मध्ये प्रदर्शित झाला.

सध्या इंस्टाग्रामवर chintoo_toon ह्या पानावरदेखील ही चित्रकथा प्रकाशित केली जाते.[]

कथानक

चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय मराठी घरातील मुलगा आहे. या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातील घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटूला त्याच्या वयाच्या सर्व मुलांपुढे असणऱ्या समस्या भेडसावतात. उदाहरणार्थ पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खूप आवडते. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधून मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणि नवे खेळ घेऊन खेळणे आवडते. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैऱ्या तोडणे हा त्याचा एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी, विशेषतः कुत्रा पाळणे आवडते पण त्याचे आई-पप्पा त्याला यासाठी परवानगी देत नाहीत.

पात्रे

पप्पा

चिंटूचे बाबा (वडील).

आई

चिंटूची आई.(दीपा)

आजोबा आणि आजी

चिंटू त्याच्या आजी आणि आजोबांचा लाडका आहे. विशेषतः आजोबांना चिंटूचे लाड करायला आवडते. चिंटूला नवीन खेळ किंवा आणखी काही हट्ट करायचे असतील तर तो आजोबांकडे जातो.

पप्पू

चिंटूचा सर्वात जवळचा मित्र. हा चिंटूला संकटात नेहमी मदत करतो. पण राजू हे एक खूप मोठे संकट आहे जे कुणालाच आवरता येत नाही.

मिनी

चिंटूच्या कंपुतली मुलगी. हिला शाळेत जाणे, परीक्षा आणि अभ्यास आवडतो. ती मनापासून कविता करते परंतु तिच्या कंपूमध्ये कुणालाच तिच्या कविता आवडत नाहीत. मिनीला आवडणार सर्व गोष्टी चिंटूला नकोश्या वाटतात. चिंटू आणि मिनीचे बहुतेक वेळेस पटत नाही.

बगळ्या

कंपूतला बावळट. ह्याचे नाव त्याच्या उंच आकृतीमुळे पडले आहे.

राजू

राजू हा कंपूतला गुंड मुलगा. हा ताकदवान आहे पण थोडा मंद. ह्याला विनोद पटकन कळत नाहीत, जर तुम्ही हुशार असाल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याच्यासमोर त्याच्यावर विनोद करून सुटू शकता. पण जर त्याच्या लक्षात आले तर मात्र खैर नाही, तो चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. चिंटू राजूची नेहमी चेष्टा करतो आणि भरपूर मार खातो.

जोशी काकू

चिंटूच्या शेजारी, यांच्या घरामध्ये एक बाग आहे. आजूबाजूच्या मुलांच्या खोड्यांचा यांना खूप त्रास होतो. उदाहरणार्थ क्रिकेट खेळतांना फुटलेल्या काचा किंवा चोरीला गेलेल्या कैऱ्या.

सोनू

चिंटूच्या घराच्या आसपास राहणारा एक छोटा मुलगा. लहान मुलांचा गोंडस, निरागस तर कधी खट्याळ अश्या रुपात सोनू ह्या कथेत येतो.

बंटी

बंटी हा बगळ्याचा पाळीव कुत्रा आहे. बंटीला सांभाळताना बगळ्या आणि इतरांची अनेकदा तारांबळ उडते, मात्र तो सगळ्यांचा आवडता आहे.

नेहा

चिंटूच्या कंपूतील एक मुलगी. नेहाचे पात्र कथेत सुरुवातीच्या काळात मिनीची मैत्रीण म्हणून आले आहे. कालांतराने ती मूळ कंपूत दाखल झाली. इतर मित्रांच्या मानाने ती कथेत कमी वेळा येते.

सतिश दादा

चिंटूच्या शेजारी राहणारा कॉलेजवयीन तरुण. तो कथेत तरुण लोकांचे प्रातिनिधिक रूप म्हणून कधी कधी येतो.

जोशी काका

जोशी काकूंचे पती. काही भागातून ते जोशी काकूंसोबत दिसतात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ ऍग्रोवन (१५ जून २०१३). "'चिंटू' पोरका झाला! प्रभाकर वाडेकर यांचे निधन". ॲग्रोवन. २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ https://instagram.com/chintoo_toon?igshid=MzRlODBiNWFlZA==

बाह्य दुवे