Jump to content

चिंचवणे

चिंचवणे हे गाव अकोले तालुक्यातील एक महत्त्वाचं खेडे आहे.या गावाकडे जाण्यासाठी अकोले तालुक्यातून किंवा राजूर या गावापासून जाता येते.या गावाकडे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची गाडीने जावे लागते.तसेच अकोले पासून हे गाव १६km अंतरावर आहे.तसेच ह्या गावापासून अगदी जवळ म्हणजे ६km अंतरावर राजूर सारखी खूप मोठी बाजार पेठ आहे.ती बाजार पेठ महाराष्ट्रात स्थान मिळवणारी एक बाजार पेठ आहे.अकोले या ठिकाणावरून हरिश्चंद्रगडाकडे जाण्यासाठी ह्या गावा वरतून पण जाता येते.या गावामध्ये वेताळेश्र्वर म्हणून एक प्रसिद्ध देवस्थान आहे.ह्या देवस्थानाची यात्रा धुळीचा पाडवा या दिवशी असते.