चिंचवड
चिंचवड | |
जिल्हा | पुणे |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | १०,०६,४१७ २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२० |
टपाल संकेतांक | ४११-०३३ |
वाहन संकेतांक | MH-१४ |
निर्वाचित प्रमुख | सौ.माई ढोरे (महापौर) |
प्रशासकीय प्रमुख | राजेश पाटिल(भाप्रसे) (आयुक्त) |
संकेतस्थळ | http://www.pcmcindia.in |
चिंचवड हे पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाखाली येते.
इतिहास
चिंचवड ह्या गावाचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तऐवजांत येतो. पेशव्यांनी चिंचवड येथील मंदिराला देणगी दिल्याचा उल्लेख सापडतो. चिंचवड हे मुख्यत: मोरया गोसावी ह्या संतांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. पवना नदीकाठी गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. जवळपास मोरया गोसावींची समाधी आहे. हे गाव क्रांतिवीर चापेकर बंधूचे जन्मस्थळ आहे.
भूगोल
- चिंचवड पुण्यापासून २० किलोमीटरवर
- हिंजवडी आय.टी. पार्क चिंचवडपासून ७.५ किलोमीटरवर.
- मुंबई १७० किमी
नदी
प्रवास सुरू करण्यासाठी स्थानके
- जवळचे रेल्वे स्थानक चिंचवड स्टेशन (२ किमी)
- जवळचे मोठे रेल्वे स्थानक पुणे स्टेशन (१८ किमी)
- जवळचे विमान तळ पुणे विमान तळ. (२२ किमी)
- जवळचे एस्टीचे बस स्थानक वल्लभ नगर (५.५ किमी)
वाहतुकीची साधने
- रेल्वे
- शहरी वाहतुकीसाठी महानगरपालिका चालवत असलेल्या बसेस (पी.एम.पी.एम.एल.)
- ऑटोरिक्षा
- ओला आणि कुबेर
चित्रपटगृहे
- कार्निव्हल सिनेमा
- जयश्री टॉकीज
- पीव्हीआर सिटी वन
- आयनाॅक्स जय गणेश आणि आयनॉक्स एल्प्रो सिटी स्क्वेअर
रंगभूमी
- रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड स्टेशन रोड
पर्यटन स्थळे
- मोरया गोसावी मंदिर
- मंगलमूर्ती वाडा
- दुर्गा टेकडी
- पवना काठ
- सायन्स पार्क
महत्त्वाच्या शाळा
- श्री जैन फत्तेचंद शाळा
- माटे शाळा
- न्यू इंग्लिश स्कूल
- पोदार इंग्रजी माध्यम शाळा, नवीन पुणे
रुग्णालये
- लोकमान्य हॉस्पिटल
- आदित्य बिर्ला हॉस्पिटल
- मोरया हॉस्पिटल
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल(तालेरा हॉस्पिटल)
बाजारपेठ
- गांधी पेठ
- मंडई
- बेंद्रे वाडा, नवीन पुणे