चिंगी (चित्रपट)
चिंगी हा मराठी चित्रपट आहे.
- कथा : प्रो.किसनराव वि. कूराडेपाटील
- गीते - पटकथा - संवाद : अशोक पाटोळे
- संगीत : अशोक पत्की
- छायांकन : रफीक शेख
- कार्यकारी निर्माता : मोहित इसरानी
कथानक
मुंबईत राहणारे एक सुखी व आनंदी जोडपे रोहन दाते व आरती दाते(गिरिजा ओक व मिलिंद गवळी) त्यांच्याकडे गावावरून कधीकधी आईवडिल (रविंद्र बेर्डे व ईला भाटे) येऊन राहत असतात.
दोघेही नोकरी करणारे - आपालल्या कामात व्यस्त. फॅमिली प्लॅनिंग केल्यामुळे लग्नाला तीन वर्ष झालेली असूनही मूल नाही.
रोहनची आई सारखी 'नातवासाठी' मागे लागत राहते. आरतीला ही गोष्ट पटत नसते. त्या बद्दल ती तिची नाराजगी रोहनकडे व्यक्त करत राहते.
आरतीचे माहेर तसे आर्थिकदृष्ट्या सामान्य, कुटुंबात आरती खेरीच तिच्या चार बहिणी प्रियंका, रिंकू, वीणा आणि सलोनी (अदिती सारंगधर, स्नेहा वाघ, हर्षाली झिने, स्विनी कारवीर) आणि आईवडील खूप आनंदात राहत असतात. रोहणच्या ऑफीसमधील मित्राचे स्थळ (संदिप भंसाली) रोहन प्रियंकासाठी आणतो आणि मुलगी पसंतही पडते. श्यामचे कुटुंब मुलीला बघायला येतात. मुलीच्या परिवाराबद्दल माहिती मिळताच श्यामची आई (चारूशीलो वाच्छानी) नाराज होते अणि लग्न मोडते. या गोष्टीचा आरतीवर प्रखर परिणाम होतो. एकीकडे रोहणच्या आईचा 'नातुच हवा' हा हव्यास आरतीला नाराज करत राहतो.
समाजात आज मुली कितीही पुढारलेल्या असल्या तरीही त्यांना असे दुय्यम समजल्या जाणाऱ्या परिस्थीतीचा आरतीला तिटकारा येतो. याच दरम्यान ती स्वतः गरोदर आहे हे तिच्या लक्षात येते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली आणि प्रगतीचे गड सर केले असले तरी आजही समाजावर जुन्या चालीरितींचा पगडा बसलेला दिसतो. त्यातलाच एक भाग म्हणजे मुलगी नको असणे हे आहे. सासुचा मुलासाठीचा हव्यास आरतीला बैचेन करत राहतो. त्यातून मुलगी झाली तर तिला खडतर आयुष्याला तोंड द्यावे लागेल हे तिच्या अगदी मनात बसलेले असतं. त्यामुळे ती रोहनला न सांगता काही निर्णय घ्यायचे ठरवते.
सामान्य माणसाच्या आयुष्यात अनाकलनीय गोष्टी घडायला लागतात आणि हृदयाला स्पर्श करणारी चिंगीची गोष्ट सुरू होते.