चालू खाते
चालू खाते हे बँक आणि इतर वित्तसंस्थांमधील एक प्रकारचे ठेवखाते आहे.
हे खाते सहसा धंद्यासाठी किंवा सारखी उठाठेव लागणाऱ्या व्यवसायांसाठी वापरले जाते.हे खाते व्यावसायिक , उद्योजक , व्यापारी यांच्याकडून उघडले जाते
भारतातील चालू खात्यांचे काही गुणधर्म
- या खात्यावर जी रक्कम जमा असते तिच्यावर व्याज दिले जात नाही
- विविध प्रकारच्या सेवा उदा. धनादेश, एटीएम, जालिय बँकिंग ( इंटर नेट बँकिंग) सशुल्क दिल्या जातात.
- या खात्यावर कितीही व्यवहार केले जाऊ शकतात. दर दिवशी किंवा दर महिन्याला ठराविकपेक्षा कमी व्यवहार करण्याचे बंधन नसते.
- किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बँक दंड करू शकते.
- चालू खात्यामध्ये ठेवण्याची किमान रक्कम इतरांपेक्षा अधिक ठेवून इतर काही सवलती मोफत देण्याची पद्धत बँकांनी आजकाल चालू केली आहे.
- या खात्यासाठी बॅॅंकेकडुन पासबुक दिले जात नाही , खाते तपशील पाहण्यासाठी विवरणपत्र दिले जाते