चार दृश्य
बौद्ध धर्म |
---|
चार दृश्य म्हणजे गौतम बुद्धांच्या नजरेस पडलेल्या चार घटना होय. ज्यामुळे त्यांच्या जीवनातील अस्थिरता आणि दुःखाचे अस्तित्व ज्ञात झाले. या आख्यायिकेनुसार या दृश्यांशी सामना होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतमाला त्याचे वडील राजा शुद्धोधनांनी राजमहालात त्यांना ऐश्वर्यात ठेवले होते; कारण त्यांना भीती होती कि तथागत बुद्ध घर सोडून संन्यस्थ जीवन पत्करतील.
आंबेडकरांचा दृष्टिकोन
बाबासाहेब आंबेडकरांनी आपला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिला आहे. प्रस्तावनामध्ये, आंबेडकरांनी चार प्रश्नांची सूची दिली आहे. त्यापैकी एक प्रश्न आहे – 'बुद्धाने परिव्रजा (गृहत्याग) का घेतली ?'[१]:
प्रथम प्रश्न बुद्ध जीवनातील एका मुख्य घटनेशी संबंधित आहे, ती म्हणजे परिव्रज्या. बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली? ह्याचे पारंपारिक उत्तर म्हणजे, त्यांनी मृत देह, आजारी व्यक्ती आणि एक वृद्ध व्यक्ती पाहिला म्हणून. वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धांनी आपल्या वयाच्या २९ व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. या तीन दृश्यांची परिणती म्हणून जर बुद्धांनी परिव्रज्या घेतली असली तर ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्यांना आधी कधी दिसली नाहीत? ह्या शेकड्यांनी घटणाऱ्या सर्वसामान्य घटना आहेत, आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते. त्यांनी त्या ह्याच वेळी त्या प्रथम पाहिल्या हे पारंपारिक स्पष्टीकरण स्वीकारणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते?
संदर्भ
- ^ Pritchett, Frances. "The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar". www.columbia.edu. 2018-04-15 रोजी पाहिले.