चारुचंद्र बिस्वास
चारू चंद्र बिस्वास (२१ एप्रिल, इ.स. १८८८ - ९ डिसेंबर, इ.स. १९६०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५२ ते १९६० या काळात ते पश्चिम बंगालकडून राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९५३ ते १९५४ पर्यंत ते राज्यसभा सभागृहाचे नेते होते. इ.स. १९५२ ते १९५७ पर्यंत ते राज्यमंत्री व नंतर कायदा व अल्पसंख्यक मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीही होते. त्यापूर्वी ते कलकत्ता येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते.[१][२]
हे सुद्धा पहा
- भारताचे कायदामंत्री
संदर्भ
- ^ "Previous Members Biography Rajya Sabha" (PDF). Rajya Sabha. 18 July 2014 रोजी पाहिले.
- ^ "Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952". Rajya Sabha. 18 July 2014 रोजी पाहिले.