चाफेकर
चाफेकर हे एक मराठी आडनाव आहे. या आडनावाच्या लोकांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातील चाफे हे गाव आहे. चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रॅन्डचा खून केल्यानंतर ते तीनही भाऊ पकडले गेले. त्यानंतर महाराष्ट्रातील तमाम चाफेकरांनी आपण ’त्या’ चाफेकरांचे कोणीही नाहे हे दर्शविण्यासाठी आपले आडनाव’चाफेकर’ नसून ’चापेकर’ आहे असे सांगायला सुरुवात केली. प्रत्यक्षात ’चापे’ नावाचे गाव कोकणात नसल्याने ’चापेकर’ हे आडनावही कोकणस्थांत नाही.
खालील दिलेल्या यादीतले काहीजण ’चाफेकर’ऐवजी ’चापेकर’ आडनाव लावत असले तरी या सर्वांचे खरे मूळ आडनाव ’चाफेकरच आहे.[ संदर्भ हवा ]
या विकिपीडियावर चाफेकर नावाचे पुढे उल्लेखिलेले लेख आहेत :-
- क्रांतिकारक चाफेकर बंधू
- क्रांतिकारक दामोदर चाफेकर
- क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकर
- क्रांतिकारक वासुदेव हरी चाफेकर
- नाट्यअभिनेते शंकर नीळकंठ चाफेकर
- प्राध्यापक श्री.नी. चाफेकर ऊर्फ नानासाहेब चाफेकर
- ’आमचा गाव बदलापूर’चे लेखक ना.गो. चाफेकर ऊर्फ नानासाहेब चाफेकर