Jump to content

चातुर्वर्ण्य

चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ग्रंथात उल्लेखलेले सामाजिक वर्ग आहेत.[][][] हिंदू साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात विभागले.[][]

प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण
ब्राह्मण • क्षत्रियवैश्यशूद्र


वरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सवर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना सवर्णात स्थान दिलेले नाही, कारण यांना अवर्ण म्हणले गेले.[][]

  • सवर्ण म्हणजे काय?*

सवर्ण म्हणजे सहवर्ण (With वर्ण, वर्णासह)

भगवद्गीता अध्याय १८ श्लोक नंबर ४१ अनुसार वर्ण हा कर्मावर आधारित आहे.

ब्राह्मण हा एक वर्ण आहे (ब्राह्मण ही जात नाही).

ब्राह्म हा एक निरुक्त शब्द आहे म्हणजे या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ब्राह्म म्हणजे Knowledge, अरबी भाषेत उलुम. ज्याच्याजवळ उलुम आहे तो उलेमा किंवा ज्याच्या जवळ ब्राह्म (Knowledge) तो ब्राम्हण. ब्राह्मण म्हणजे scholar.

क्षत्रिय म्हणजे जो इतरांना रक्षण देतो अर्थात छत्र देतो आहे तो क्षत्रिय.

वैश्य म्हणजे व्यवसाय करणारा.

शूद्र म्हणजे सेवक, किंवा नोकर.

वर्ण हा फक्त गुणविशेष आहे. यामधे उच्च-नीच असे काही प्रकार नाहीत.

चंद्रसोमयदूहैहयवृष्णीकृष्णवंशीगायकवाडकुलोत्पन्न दत्ताजीसूतप्रवीण.

कार्ये व लक्षणे

ब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणे

शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.

क्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणे

युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.

वैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणे

देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.

शूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणे

वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गायींचे व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.

संदर्भ

  1. ^ a b Doniger, Wendy (1999). Merriam-Webster's encyclopedia of world religions. Springfield, MA, USA: Merriam-Webster. p. 186. ISBN 978-0-87779-044-0.
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Monier-Williams 2005 924 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Malik 2005 p.48 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ Ingold, Tim (1994). Companion encyclopedia of anthropology. London New York: Routledge. p. 1026. ISBN 978-0-415-28604-6.
  5. ^ Kumar, Arun (2002). Encyclopaedia of Teaching of Agriculture. Anmol Publications. p. 411. ISBN 978-81-261-1316-3.[permanent dead link]
  6. ^ Chandram, Bipan (1989. India's Struggle for Independence, 1857-1947, pp. 230-231. Penguin Books India
  7. ^ Yājñika, Acyuta and Sheth, Suchitra (2005). The Shaping of Modern Gujarat: Plurality, Hindutva, and Beyond, p. 260. Penguin Books India
  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा (२१-२४)

बाह्य दुवे