चाणक्य मंडल
चाणक्य मंडल ही एक अविनाश धर्माधिकारी संचलीत शासकीय स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची पुर्वतयारी करून घेणारी पुणे येथील खासगी शिकवणी संस्था आहे. चाणक्य मंडलची स्थापना १० ऑगस्ट १९९६ रोजी झाली.
'चाणक्य मंडल परिवार'ची उद्योजकता विकास केंद्र स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास कार्यक्रम घेते.
'चाणक्य मंडल परिवार'
कार्यक्रम
[ संदर्भ हवा ] युवापिढी म्हणजे सर्वसाधारणपणे वयोगट १४ ते ३०. हा वयोगट डोळ्यांसमोर ठेवून युवक-युवतींना सर्वप्रकारच्या , व्यवसाय मार्गदर्शन, उद्योजकता विकास आणि व्यक्तिमत्त्व विकसन यांचं मार्गदर्शन करतं असं केंद्र म्हणजे 'चाणक्य मंडल परिवार' युवकांच्या बुद्धीचा कल ओळखण्यासाठी त्यांच्या Aptitude Tests घेऊन त्या युवकाला योग्य कारकीर्द निवडायला 'चाणक्य मंडल परिवार' मदत करते.
इयत्ता दहावीतल्या NTS पासून ते बँकिंग, संरक्षण, कारकून भरती, तसंच UPSC द्वारे IAS,IFS,IPS, केंद्रीय सेवा आणि MPSC द्वारे उपजिल्हाधीकारी , पो. उपअधीक्षक , तहसीलदार, गट विकास अधिकारी, अन्य राज्यसेवा अश्यांसारख्या वरिष्ठ पदांवर अधिकारी ज्या परीक्षांमधून निवडले जातात अश्या सर्व स्पर्धापरीक्षा. या परीक्षांची तयारी करून घेते.
'चाणक्य मंडल परिवार'ची ध्येयवाक्ये आहेत :
१) वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेल्या युवापिढीसाठी...... आणि
२) राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून ......